✒️ योगेश मेश्राम चिमूर (मालेवाडा विशेष प्रतिनिधी)
मालेवाडा (दि.6 एप्रिल) :- ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे दिनांक 5/04/2023 ला रोज बुधवारला करिअर काउन्सिलिंग आणि प्लेसमेंट सेल, समान संधी उपक्रम केंद्र व आयक्यूएसी विभाग, यांच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आमिर धम्मानी सर यांच्या मार्गदर्शनात एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी अतुल्य शिक्षा फाउंडेशन अंतर्गत नारायणा आय. ए. एस. अकॅडमी नागपूर तर्फे डॉ. अतुल नारायण परशूरामकर सर व सौ. लीना पांडे मॅडम यांना आमंत्रित करण्यात आले होते.
डॉ. अतुल परशूरामकर सर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थांना यूपीएससी व एमपीएससी व इतर विविध स्पर्धा परीक्षाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रमाबाबत तसेच स्पर्धापरीक्षांची तयारी कशी करावी या बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमानिमित्त मचांवर उपस्थित प्रा. संदीप मेश्राम सर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थांना स्पर्धा परीक्षांची तयारी करतांना सातत्यता आणि अभ्यासातील प्रामाणिकता ज्यांच्या अंगी असेल ते नक्कीच या परीक्षेत यशस्वी होतील असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन बीएससी तृतियची विद्यार्थिनी कु. प्राजक्ता कोसरे हिने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विवेक माणिक सर यांनी केले व प्रा. नागेश ढोरे सर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.
