बोर्डा गावातील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर द्या..मनसेची मागणी Give speed breaker on main road borda village..mns demand

269

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.5 एप्रिल) :- बोर्डा ते जामगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे.बोर्डा गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ब्रेकर नसल्याने वाहन चालक भरधाव गाडी पळवत आहे.याच रस्त्यालगत जिल्हा परिषद शाळा असल्याने लहान मुलांची रेलचेल असते.

या मार्गावर लहान मुले ,वृद्ध पायी जाणारे नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कालच बोर्डा गावातलगत असलेल्या शेताजवळ दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याने वेळीच रस्त्यावर ब्रेकर बनवून वाहनांच्या वेगावर नियंत्रण करणे गरजेचे झाले आहेत.

 रस्त्यावर ब्रेकर देण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी ग्राम पंचायत बोर्डा यांच्या मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले .निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी ,सागर जांभुळे, अजय जांभुळे ,राजू सोयाम ,गोवर्धन येटे ,गिरीधर येटे सह गावातील नागरिक उपस्थित होते.लवकरात लवकर या रस्त्यावर स्पीड ब्रेकर तयार करावे अन्यथा मनसे आंदोलन करेल असा इशारा मनसे तर्फे देण्यात आला आहे.