बुलढाणा अर्बन च्य वतीने प्रा अशोक डोईफोडे यांचा सपत्नीक सत्कार Prof.Ashok doifode felicitated on behalf of buldhana urban

✒️ सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.6 एप्रिल) :- बुलढाणा अर्बन चे विभागीय व्यवस्थापक श्री राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर शाखेच्या वतीने नुकतेच महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथून 33 वर्षापेक्षा जास्त सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले शाखेचे खातेदार प्रा अशोक डोईफोडे यांचा सपत्नीक सत्कार 5 मार्च ला गडचांदूर शाखेत करण्यात आला.

प्रा अशोक डोईफोडे यांचा सत्कार शाखा व्यवस्थापक विष्णू घायाळ यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.तर सौ प्रभाताई डोईफोडे यांचा सत्कार सौ जया घायाळ यांच्या हस्ते साडी,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला,

शाखा व्यवस्थापक विष्णू घायाळ यांनी जेष्ठ पत्रकार प्रा अशोक डोईफोडे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी चा गौरव करून बुलढाणा अर्बन च्या वतीने पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या,

याप्रसंगी शाखेचे कर्मचारी अनिरुद्ध महालक्षमे,कु पल्लवी बदखल,गौरव दर्शनवार, शुभम पांचाळ,अधिकृत सुवर्णकार दिलीप बोधे, गौरव सोनी,खातेदार सभासद बाळूभाऊ घायवणकर,सुहास डोईफोडे व इतर व्यापारी, सभासद, व खातेदार उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शाखा व्यवस्थापक विष्णु घायाळ यांनी केले.