अरे बापरे . वाघाच्या चामड्याची तस्करी ? Oh dear..tiger skin smuggling?

1223

🔸सहा आरोपींना अटक

🔹जिवती वनविभागाची बेधडक कारवाई

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.2 एप्रिल) :- वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या सहा आंतरराज्यीय आरोपींना जिवती वनविभागाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. येथील वनविभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई तालुक्यातील पाटागुडा येथे करण्यात आली आहे.

जिवती येथील वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार पाटागुडा येथे वाघाच्या कातडीची तस्करी करणारे आंतरराज्यीय काही आरोपी येणार असल्याची माहिती होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे यांनी तालुक्यातील पाटागुडा गावी सापळा रचून वाघाची कातडी विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले.

या कारवाई मध्ये एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली असता, सदर वाघाची शिकार संबंधित आरोपींनी तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जवळच्या भागत केली आणि वाघाची कातडी तस्करी करण्याकरिता महाराष्ट्रातील पाटागुडा गावात आणले. तस्करी प्रकरणी मागील तीन-चार महिन्यापासून या टोळीच्या मार्गावर असतांना २ एप्रिल ला जिवती वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास मुख्य वनसंरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक मध्य चांदा श्वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे करीत आहेत. यावेळी एस व्ही सावसागडे, अनंत राखुंडे, के बी कडकाडे, डी ए राऊत, वनरक्षक संतोष आलाम, संजय गरमाडे, प्रदीप मरापे, बालाजी बिंगेवाड यांनी मोलाचे कार्य केले.