✒️ योगेश मेश्राम चिमूर (मालेवाडा प्रतिनिधी)
मालेवाडा (दि.23 मार्च) :-आज दिनांक २३ मार्च २०२३ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर येथे शहीद दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शहिद क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना आदरांजली वाहण्यात आली.
तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तसेच मराठी विभागप्रमुख प्रा. पाटील सर, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. पिसे सर आणि प्रा. वाकडे सर उपस्थित होते.
तसेच प्रा. पोपटे सर, प्रा. रहांगडाले सर, प्रा. गजभिये सर, प्रा. मेंढूलकर सर, उपस्थित होते. यावेळी प्राचार्य सरांनी भारतीय क्रांतिकारी इतिहासावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजूरवाडे सर तर आभार प्रा. कात्रोजवार सर यांनी मानले. कार्यक्रमाला अनेक विद्यार्थ्यांनी आपली हजेरी लावली.
