मांगली येथील जगन्नाथ मंदिरात दोन वृध्दांची हत्या Two old men were killed in the Jagannath temple in mangli

684

🔸अज्ञात मारेकऱ्यांनी दानपेटी पळवली

🔸Unknown killers stole the donation box

✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadravti प्रतिनिधी)

भद्रावती(दि.23 मार्च) :- तालुक्यातील मांगली गावाजवळील नवरगाव रिठ शिवारात असलेल्या जगन्नाथ मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी पळविण्याच्या प्रयत्नात दोघा वृध्दांची हत्या केल्याने संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.सदर हादरविणारी घटना मांगली गावाजवळील जगन्नाथ मंदिरात दिनांक 23रोज गुरुवारला मध्यरात्रीनंतर घडली.

बापुराव खारकर वय 80वर्ष व मधुकर खुजे वय 65 वर्ष अशी या मृतक वृध्दांची नावे आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असुन आवश्यक ती प्राथमीक कार्यवाही केल्यानंतर त्यांनी श्वानपथकाच्या सहाय्याने या अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेणे सुरु केले आहे.

घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन घटनास्थळ परिसरात खबरदारीचा ऊपाय म्हणुन दंगानियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले.सदर मंदिराला लागुन मृतक बापुराव खारकर यांचे तर तर मंदिरासमोरील रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला मृतक मधुकर खुजे यांचे शेत आहे.शेतात त्याची पाळीव जनावरे नेहमी राहात असल्याने हे दोघेही रात्रोच्या वेळेस आपआपल्या शेतात राखणीस झोपत असतात. घटनेच्या दिवशिही ते नेहमीप्रमाणे शेतात झोपले होते.

मध्यरात्रीनंतर मंदिरात आवाज झाल्यामुळे ते मंदिराकडे आले असावे तेव्हा त्यांना हे अज्ञात चोरटे मंदिरातील दानपेटी फोडतांना दिसले असावे. त्यांनी या चोरट्यांना आडकाठी केल्यामुळे या चोरट्यांनी तिक्ष्ण हत्या राने त्यांची हत्या केली असावी असा अंदाज आहे.हत्या केल्यानंतर हे अज्ञात चोरटे पळून गेले.सकाळी मृतक बापुराव खारकर यांचा नोकर शेतात आल्यानंतर सदर घटना उघडकीस आली.मंदिराच्या काही दुर अंतरावर दानपेटी फोडलेल्या अवस्थेत आढळून आली.

मंदिराच्या काही दुर अंतरावर अर्धवट खाल्लेली बिर्याणी व दारुची बॉटल आढळून आल्याचे कळते.सदर घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असुन घटनस्थळवर नागरिकांनी सकाळी मोठी गर्दी केली होती.दरम्यान घटनेचे गांभिर्य ओळखून वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या या घटनेतील अज्ञात आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.