वडाळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न Rashtrasant tukdoji maharaj death anniversary program concluded at wadala

🔸गोपालकाला, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

 ✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

 शेगाव बू (दि 23 मार्च) :- जवळच येत असलेल्या वडाळा तुकुम येथील हनुमान मंदिराच्या पटांगणा वंदनीय तुकडोजी महाराज यांची दरवर्षी मोठ्या उत्साहाने आनंदमय वातावरणात पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला.

दोन दिवसीय चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात परीसरातील गावकऱ्यांचा मोठा सहभाग दर्शवला यावेळी सकाळी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ध्यान प्रार्थना , कलश व पादुका पूजन , घटस्थापना ,ग्राम सफाई , महिलांकरिता हळदी कुंकू कार्यक्रम , यावेळी घेण्यात आले.. 

गावातील प्रमुख मार्गांनी आष्टा, खुटवंडा,किनारा,वडाळा भजन मंडळी, लेझीम पथक यांनी गावातून दिंडी व पालखी मिरवणूक सहभाग घेत गावात जणू पंढरीची वारीचे धार्मिक वातावरण निर्माण केले होते….

 या कार्यक्रमाच्या वेळी काल्याचे आयोजन करण्यात आले असून सप्तखंजरी वादक उदयपाल महाराज वणीकर यांच्या हस्ते गोपालकाला संपन्न करण्यात आला.यावेळी उपस्थित भाऊराव जीवतोडे, रामभाऊ दडमल, संभाजी ननावरे,वनपाल, कामटकर,वनपाल, वनरक्षक धात्रक, बबनराव उत्तरमारे.

सरपंच पूजा उईके, उपसरपंच दिलीप ढोक, बाजीराव गजबे, अशोक देवगडे, शंकर गायकवाड, मारुती भरडे, नरेंद्र जवादे, प्रवीण देवगडे, आदी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवट महाप्रसादने करण्यात आला यावेळी गावातील युवक,युवती,मंडळींनी, मोठ्या प्रमाणात सहकार्य केले……