यवतमाळ जिल्ह्यातील बेलदरी येथे वीज पडून शेतकऱ्याच्या कापसाच्या गंजीला आग A farmer’s cotton gantry caught fire due to lightning at beldari in Yavatmal district 

252

🔹शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

Loss of lakhs of rupees to the farmer

✒️ गजानन लांडगे महागाव(Yavatmal प्रतिनिधी)

महागाव(दि.20 मार्च) :- यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात मोजा बेलदरी येथे वीज पडल्याने शेतकऱ्याच्या कापसाच्या गंजीला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले ही घटना 18 मार्च रोजी रात्रीच्या सुमारात घडली नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव जयवंत गुलाबसीग आडे आहे.

याबाबत अशी माहिती मिळाली की रात्री आठच्या सुमारास अचानक रात्री वादळी पाऊस व विजेच्या कडकडाट झाल्याने वीज पडून शेतातील घरामधील साठवून ठेवलेल्या सुमारे 70 क्विंटल कापूस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

आडे यांचे शेतात पक्के घर असून शेतामध्ये जनावरे सर्व साहित्य व शेतात निघालेला संपूर्ण माल शेतातच ठेवला असताना सकाळी शेतात सालगडी सुरेश जाधव झाडू मारण्यासाठी गेला असता घरामधून धूर निघत असल्याचे आढळून आले दरम्यान आरडा ओरडा केली व गावकरी शेतात धाव घेत कापूस विझवण्याचा प्रयत्न केला सुदैवाने बाजूला बांधलेली बैल सुरक्षित असून जीवित हानी झालेली नाही पंचनामा करून शेतकऱ्यास त्वरित मदत मिळावी अशी मागणी होत आहे