आर्णी तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान  Unseasonal rain in Arni taluka

177

🔹अनेक घराची पळझळ तर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Many houses were destroyed and the farmers suffered huge losses)

✒️गजानन लांडगे महागाव (Yavatmal प्रतिनिधी)

महागाव (दि.27 एप्रिल) :- 

           अवकाळी पावसाचे थैमान आर्णी तालुक्यातील आयता या गावामध्ये अनेक घरांचे झाले नुकसान हाता तोंडाशी आलेले पीक उध्वस्त यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे.

कालच्या आभाळ व ढगाळ वातावरणामुळे आर्णी तालुक्यातील आयता या गावामध्ये आवकाळी पावसाने काल रात्री पासूनच मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडाटेसह वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली वादळी वाऱ्याने आयता या गावामध्ये मोठ्या प्रमाणात घराचे व शेतातील मालाचे नुकसान झाले आहे.

या अवकाळी पावसामुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या सर्व गोष्टी ची बाब लक्षात घेऊन घटनास्थळी पंचनामा करून तात्काळ शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी समस्त गावकरी करीत आहेत.