चंद्रपूर जिल्हयातील शेतकरी यांची पीक कर्ज भरण्याची मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढविण्यात यावी : रवींद्र शिंदे Crop loan payment deadline of farmers in chandrapur district should be extended till June 30,2023 :Ravindra shinde 

🔹राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन सादर

Submitted a memorandum to the chief minister of the state,eknathji shinde

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.20 मार्च) :- चंद्रपूर जिल्हयातील शेतकऱ्यांची पीक कर्ज भरण्याची मुदत ३० जून २०२३ पर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी घेवून वरोरा-भद्रावती शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन दिले आहे.

चंद्रपूर जिल्हयातील शेतकऱ्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीककर्जे घेतली असून ती पीककर्जे भरण्याची अंतीम मुदत ही ३१ मार्च असते.

शेतकरी हा जगाचा पोशींदा अन्नदाता आहे. शेतकरी यांची आज सर्वात वाईट परिस्थती आहे. या पीक कर्ज हंगामात दोनदा अतिवृष्टी झाली व वारंवार निसर्ग त्यांच्यावर कोपत आहे. आता कुठे पीक हातात यायला लागले तर अचानक पावसाने कहर केला आणी पीकाचे नुकसान झालेले आहे. शेती ही शेतकऱ्यांसाठी उपजीविकेचे एकमेव साधन आहे. अनेक समस्यांना तो सामोरे जात असून घरी शेतीमाल पडलेला आहे.

या सर्व गोष्टीचा विचार करता तथा तत्कालीन राज्य सरकारने दोन वर्षाआधी ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना पीककर्ज भरण्याची सवलत दिली होती. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांच्या सध्या स्थीतीचा त्यांच्यावर होत असलेला निसर्गाचा मारा या सर्वाचा विचार करता यावेळी सुध्दा  ३० जून २०२३ पर्यंत पीककर्ज भरण्याकरीता शेतकऱ्यांना सवलत लागू करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनात आहे.

सदर निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, विधानसभा विरोधीपक्ष नेता अजितदादा पवार, विधान परीषदचे विरोधीपक्ष नेता, अंबादासजी दानवे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आदींना देण्यात आले आहे.