महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार  Celebrating women on women’s day

✒️ आम्रपाली गाठले शेगांव बु (Shegaon BK प्रतिनिधी)

 शेगांव बू (दि. 8 मार्च) :- नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव बूज येथे 8 मार्च हा दिन महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रामा अंतर्गत शाळेतील महिला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंपाकी महिलांचा मेडल देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रला मान्यवरांनी मार्गदर्शन केले महिला मागासलेल्या होत्या. सावित्रीबाईनी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावुन काम करतात. महिला अंतराळावर गेल्या आज महिला सर्वच क्षेत्रात काम करतात.

याप्रमाणे विद्यार्थीनींनी आपल्या कार्याचा समाजात आदर्श निर्माण करावा विद्यार्थीनी आपल्या कार्यामुळे आई वडीलांना त्रास होणार नाही या संबंध काळजी घ्यावी असे सांगीतले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री ढाकुणकर सर, सहा. शिक्षीका सौ हिवरकर, कु. हटवार, कु दातारकर, क आसुटकर, श्री चांगले, श्री खेडीकर, प्रास्ताविक श्री सोणवाने यांनी केले