जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन

🔸हल्लेखोर गुंडावर कारवाईची अ.भा.ग्रामीण पञकार संघाची मागणी

✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.15 फेब्रुवारी) :- जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, कायदेतज्ञ असिम सरोदे, राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी, आणि ‘निर्भय बनो ‘च्या सहकार्यावर पुण्यात करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा वरोरा येथे जाहीर निषेध करण्यात आला हल्लेखोर गुंडांवर कठोर कारवाई करण्याबाबत वरोराचे तहसीलदार श्री योगेश कौटकर यांना निवेदन देण्यात आले ,यावेळी पञकार संघाचे जिल्हा सचिव जेष्ठ पत्रकार प्रदीप कोहपरे, वरोरा तालुका सचिव धर्मेंद्र शेरकुरे, संपर्क प्रमुख परमानंद तिराणीक, प्रसिद्धी प्रमुख तुलसीदास आलाम, कोषाध्यक्ष प्रशांत बदकी, उपाध्यक्ष ग्यानिवंत गेडाम , मनोज गाठले, जगदीश पेंदाम, खेमचंद नेरकर यांच्या सह विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे कि दिनांक ९फेब्रृवारी ला पुणे येथे निर्भय बनो या सामाजिक कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी जात असताना काही विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळे व त्यांच्या सहकार्यांवर व गाडीवर दगडफेक केली लाठी हॉकी स्टिक ने गाडीची तोडफोड केली तसेच अंडी , शाही फेकली दगड विटाणे गाडीवर मारा केला यात गाडीच्या गाडीचे मोठे नुकसान झाले तसेच लोखंडी सळाखीने खूपसुन वार करण्यात आला गाडीमध्ये पञकार निखिल वागळे यांच्याबरोबर प्रसिद्ध कायदेतज्ञ वकील असीम सरोदे राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी व त्यांचे सहकारी होते.

हा सर्वसामान्य लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे,हा हल्ला पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभांवर आघात करणे होय, वागळे यांनी काही आक्षेपहार्य विधाने केली असतील तर त्याला कायदेशीर मार्गाने उत्तर देणे अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी अशी कृत्य करणे हा कायद्याचा आणि संविधानाचा अपमान आहे तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकावर अतिशय कडक कारवाई करून योग्य तो संदेश सरकारकडून देण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे , महाराष्ट्रात दिवसेंदिवस पञकारांवर जिवघेणे हल्ले रेतीमाफीया, अवैध धंदे,वाल्याकडुन होत आहे ,यावर अंकुश बसावा म्हणून पञकार संरक्षण कायदा अंमलात आणावा तसेच महाराष्ट्र सरकारने पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी पत्रकार संरक्षण कायदा बनवला आहे परंतु आजपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही.

महामहीम राज्यपालांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन पत्रकार संरक्षण कायदा अमलात आणावा तसेच या घटनेतील आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये व भांरतीय दंड संहिता न्वये गुन्हा दाखल करून कडक शासन करावे असे निवेदनात म्हटले आहे निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल रमेश बैस ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ,पोलीस महासंचालक ,राज्याचे गृहसचिव ,तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त यांना वरोरा तहसीलदार योगेश कौटकर मार्फत निवेदन पाठवले आहे.