लाचेच्या मागणीत अडकले मंडळ अधिकारी व कोतवाल

🔸 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.24 फेब्रुवारी) :- शेतकऱ्यांच्या शेतीच्या फेरफार प्रकरणी चिमुर तालुक्यातील शंकरपूर येथील मंडळ अधिकारी धनंजय बुराडे व कोतवाल राहुल सोनटक्के यांनी लाचेच्या मागणी केल्या संदर्भात चंद्रपूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेली आहे.

ही कारवाही गुरुवारी दुपारी करण्यात आली आहे डोंगरगाव येथील एका शेतकऱ्याची आजोबाच्या नावाने जमीन होती त्या जमिनीचा गट क्रमांक 151/1 मधील 0.90 हेक्टर आर जमिनीचे आजोबांनी मृत्युपत्र तयार करून ठेवले होते त्या मृत्युपत्रानुसार फेरफार करण्यासाठी हे प्रकरण तलाठी कार्यालयाला देण्यात आले होते.

तलाठी कार्यालयाकडून हे प्रकरण मंडळ अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आले होतं परंतु मंडळ अधिकारी धनंजय बुराडे यांनी या फेरफार प्रकरणी 7000 रुपयाची मागणी केली होती त्यानुसार कीटाडी मक्ता येठील कोतवाल राहुल सोनटक्के यांनी हे प्रकरण तडजोडी अंति पाच हजार रुपयात केले होते परंतु त्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये द्यायचे नसल्याने त्यांनी चंद्रपूर येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी दुपारी दोन वाजता राहुल सोनटक्के याला किटाडी येथून तर शंकरपूर येथिल तलाठी कार्यालयातून मंडळ अधिकारी धनंजय बुराडे यांना अटक करून भीसी पोलीस ठाण्यात येथे नेण्यात आले आहे ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते,पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले,हवालदार रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, अमोल सिडाम,सतीश सिडाम यांनी ही कारवाई केलेली आहे .

शासकीय कामासाठी कोणत्याही कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने लाचेची मागणी केली असल्यास त्या शेतकऱ्यांनी किंवा त्या अर्जदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून या वेळी केलेले आहे…..