डोंगरगाव सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांची बिनविरोध निवड

991

🔸शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन

 ✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadravti प्रतिनिधी)

भद्रावती(दि.24 फेब्रुवारी) :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क व महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ मधील नियम १९(४) नुसार डोंगरगाव सेवा सहकारी संस्था मर्या. र. नं. ५९७ ता. भद्रावती जि. चंद्रपूर करिता सन २०२२-२३ ते २०२७-२८ साठी दि. ६ ते २० फेब्रु. २०२३ पर्यंत प्रसिद्ध कार्यक्रमाप्रमाणे संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला होता. या निवडणुकीत संचालक मंडळाकरीता नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. या नामनिर्देशन प्रक्रियेत एकही अर्ज विरोधात न आल्याने अविरोध संचालक मंडळ निवडून आले.

सदर निवडणूक प्रक्रिया ही शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख, रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात तसेच मित्रपरिवार यांचे नेतृत्वात डोंगरगाव सेवा सहकारी संस्था मर्या. संस्थेची निवडणूक अविरोध झाली.

नवनियुक्त संचालक मंडळात सर्वसाधारण गटातून जयवंत ईश्वर आवारी, प्रफुल दशरथ थेरे, राजू रमेश डोंगरे, गोविंदा सखाराम गौरकर, हनुमान तानबा टाले, दिवाकर निळकंठ खंगार, परशुराम बापूराव कसारे, बंडू विठोबा काकडे, अनुसूचित जाती/जमाती गटातून बबन नामदेव धुळे, इतर मागासवर्गीय गट राहुल सुभाष बुरण, विमुक्त भटकी जात जमात वर्गातून सुरेश दुधाराम आस्कर तसेच महिला राखीव गटात लीला गजानन कुथे, अर्चना हनुमान डाहुले सर्व तेरा उमेदवार विरोधात कुणीच फॉर्म न भरल्याने अविरोध निवडून आलेत. 

विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी नवनियुक्त डोंगरगाव सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांचे अभिनंदन केले. या अभिनंदन कार्यक्रमाप्रसंगी नंदोरी (बु) उपसरपंच मंगेश भोयर, पानवडाळा सरपंच प्रदीप महाकुलकर, प्रफुल डोंगरे, विनोद गोहोकर व इतर मंडळी उपस्थित होती. निवडणूक निर्णय अधिकारी तर्फे पारदर्शक व चोख पध्दतीने सदर निवड प्रक्रिया राबविली.