शेतकऱ्यासमोर एक आदर्श एकरी 15 ते 22 क्विंटल चण्याच उत्पादन

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.24 फेब्रुवारी) :- भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून जगात ओढकल्या जातो परंतु कृषिक्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नैसर्गिक समस्याचा व इतर समस्याचा सामना करावा लागतो याच वेगवेगळ्या समस्यावर मात करून शेगाव बु येथून जवळच असलेल्या बेंबळा या गावातील होतकरू शेतकरी श्री प्रवीण नामदेव हजारे यांनी आपल्या शेतामध्ये सिलेक्शन टरबो चाणक्य या चण्याच्या जातीची अडीच फूट अंतरावर पेरणी करून दर एकरी 15 ते 22 क्विंटल एवढे उत्पादन देणारी चण्याची जात आपल्या शेतात लावून एक नवीन आदर्श परिसरातील शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.

याच बरोबर राहुरी विद्यापीठाचे KDS 992 दुर्वा व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे PDKV 100-39 अंबा हे अधिक उत्पादन देणार सोयाबीन चे वान त्यांनी आपल्या शेतात लावले आहे.आजचा शेतकरी अनेक नवीन समस्या ला तोंड देत असताना समाजातील काही नामवंत होतकरू शेतकरी आजही शेतीची उत्पादकता टिकवून ठेवून जास्तीत जास्त उत्पादन घेत आहे .

त्यामुळे समाजातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी आणी चांगल उत्पादन घेता यावं यासाठी हजारे सरांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शनात आपल्या शेतात योग्य ते बियाणे पेरून चांगल उत्पादन घ्यावं हीच अपेक्षा अधिक माहितीकरिता 8007749375 या मोबाईल क्रमांकवर सपंर्क साधावा.