शेगाव बू. ला तालुका घोषित करा

213

🔸  प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार यांची मागणी 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.25 फेब्रुवारी) :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव बू हे गाव सर्वात मोठे गाव असून परिसरातील सर्वात मोठी बाजार पेठ आहे शिवाय येथील लोकसंख्या देखील सर्वात जास्त आहे…या गावाशी १३० गावाचा समावेश असून परिसरातील सर्वच गाव खेडे या गावाशी निगडित आहे तर येथे आरोग्य शिक्षण देवाण घेवाण करिता याच गावात नागरिकांना यावे लागते .

शेतकरी बांधवांना देखील आपले शेती उपयोगी समान तसेच बी बियाणे , रासायनिक खते ओशद्ध घेण्यासाठी शेगाव येथील कृषी सेवा केंद्रात यावे लागते तसेच शेतकऱ्यांच्या मालाची देखील खरेदी विक्री येथेच केली जाते . 

        शिवाय शेतकरी शेत मजूर , यांना देखील आपल्या जीवनाशीसंबंध असलेले वस्तूची देवाण घेवाण करण्यासाठी येथे यावे लागते. शिवाय इथे मराठी माध्यम पासून तर इंग्रजी माध्यम पासून उच्च शिक्षणाची सुद्धा सोय असल्याने इथे मोठ्या प्रमाणात युवक युवती विद्यार्थिनी शिक्षण करिता येत असतात ..

करिता गावाच्या मानाने गावचा विकास पूर्ण पणे रखडलेला असून शासन या गावाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक अनेक सुख सोय पासून कोसोदूर आहेत . सध्याची परिस्थिती लक्षात आज च्या घडीला शेगाव बू ची लोकसंख्या १७ ते १८ हजाराच्या वर आहे शिवाय दरवषी लोक संख्येत वाढ होत आहे .

शेगाव बू तालुक्यात निर्मिती केल्यास किव्हा झाल्यास परिसरातील १३० गावातील खेड्यांना याचा चांगल्या प्रकारे लाभ मिळू शकते. तालुका निर्मिती झाल्यास शासकीय धोरणनुसार ग्राम पंचायत चे नगरपंचायत मध्ये रुपांतर होईल त्यामुळे अनेक गावे विकसित होईल .नागरिकांचे जीवनमान उंचावनार. बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार अनेकांचे जीवन सुखमय आनंदमय होईल. 

     करिता शेगाव बू ला तात्काळ रीतसर तालुका घोषित करावा अशी मागणी प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार यांनी मा. ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील महसूल पशुसवरधन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री यांना निवेदन सादर करून मागणी केली आहे . शिवाय या मागणीला नागरिकांचा देखील मोठा सहभाग आहे करिता या निवेदनाची विशेष दखल घेऊन मंत्री महोदय शेगाव नगरीला तालुक्याची निर्मिती निच्चीत करेल अशी आशा शेगाव वासिय बाळगत आहे