ट्रस्टनी दिला कॅन्सर रुग्णाला “एक हात मदतीचा”

195

🔸श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपुर ई -६३५ चा उपक्रम

 ✒️मनोज कसारे भद्रावती (Bhadravti प्रतिनिधी)

 भद्रावती (दि.23 फेब्रुवारी) :- झिंगूजी स्ववॉर्ड भद्रावती येथील ६२ वर्षीय रहिवाशी माया शंकर नागपुरे ह्या दुर्धर कर्करोगाने पीडित असून आर्थिक परिस्थितीने कुमकुवत आहेत. त्यांना उपचाराकरिता नगरसेवक नंदू पढाल यांचा माध्यमातून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टकडे अर्जाद्वारे मागणी केले.

रोगाचे गांभीर्य बघता कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी तात्काळ संस्थापक अध्यक्ष रवींद्र शिंदे वरोरा -भद्रावती विधानसभाप्रमुख यांच्यासोबत संपर्क करून विश्वस्त सुषमाताई शिंदे व भास्कर पाटील ताजने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हाप्रमुख,नंदुभाऊ पढाल भद्रावती तालुका प्रमुख तथा नगरसेवक यांच्यासह रुग्णाला घरी जाऊन उपचाराकरिता आर्थिक सहकार्य केले.

या प्रसंगी श्री चंपतराव आस्वले, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दिलीप मांढरे, गौरव नागपुरे युवा सेना उपस्तिथ होते.ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी रुग्ण माया नागपुरे यांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेकरिता ट्रस्टच्या माध्यमातून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.