आनंदवनचे विश्वस्त सदाशिव ताजने यांचा सत्कार

✒️ मनोज कसारे (भद्रावती प्रतिनिधी)

भद्रावती (दि.11 फेब्रुवारी) :- विश्वलक्ष्मी प्रतिष्ठान श्रीरामपूर या संस्थेचा स्व. ॲड. रावसाहेब शिंदे स्मुर्ती सामाजिक सेवा पुरस्कार महारोगी सेवा समितीचे विश्वस्त तथा स्वरानंदवन प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक सदाशिव ताजने यांना महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे व डॉ. भारती आमटे यांच्या हस्ते देण्यात आला. 

हा पुरस्कार मिळाल्या बद्दल स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सदाशिव ताजने यांचा सत्कार केला. 

यावेळी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर उपस्थित होते .