चंदनखेडा येथे समाज प्रबोधन कार्यक्रम उत्साहात

315

✒️ मनोज कसारे (भद्रावती प्रतिनिधी)

भद्रावती(दि.5 फेब्रुवारी):- तालुक्यातील ऐतिहासिक सातवाहनकालीन सांस्कृतिक नगरी चंदनखेडा येथील आदिवासी माना जमात समाज संघटन चंदनखेडा येथील राजमाता माणिका क्लब ग्राऊंड च्या प्रांगणात दिनांक ४ व ५ फेब्रुवारी दोन दिवसीय समाज प्रबोधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी सकाळी परिसर स्वच्छतेने सुरुवात करुन नंतर समाज संस्कृती परंपरे नुसार मुठपुजा व डायका पार पडल्या व दुपारच्या सत्रात समाज प्रबोधन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शनाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे उद्घाटन गुलाब भरडे सामाजिक कार्यकर्ता यांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या जसे की क्रांतिसूर्य बिरसा मुंडा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजमाता माणिका, बाबुराव शेडमाके, भास्कर वाकडे, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

अध्यक्षस्थानी कवडुजी खडसंग सामाजिक कार्यकर्ता हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नंदकिशोर जांभुळे जिल्हा अध्यक्ष आदिवासी माना जमात विध्यार्थी संघटना .नयन जांभुळे सरपंच चंदनखेडा, लता नन्नावरे, वैशाली दडमल,आदि मान्यवर उपस्थित होते.

  व समाज प्रबोधन कार्यक्रमानंतर महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या व सायंकाळी आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला व दुसरा दिवसी ५ रविवार ला सकाळी ६ वाजता परिसर स्वच्छता करून सकाळी ८ वाजेपासून गावातुन जयघोषाच्या गजरात प्रतिमेचे मिरवणूक काढण्यात आली. 

दुपारला १२ वाजता सुनंदा हिंमत डोंगरुजी हनवते यांची जेष्ठ कन्या प्रियंका उर्फ प्रिया हिंमत हनवते व भिवापूर तालुक्यातील मंगरूळ येथील कमला संदीप पुरुषोत्तम चौखे यांचा विवाह अतिशय साध्या पारंपरिक पद्धतीने व मुलनिवासी आदिवासी महासभेच्या विचार धारणेप्रमाणे संप्पन झाला.लग्नासाठी कोणताही मुहूर्त पाहण्यात आला नाही.थोर महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करून त्यांनी मानवाच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची आठवण करित आदिवासी पाटा म्हणजेच आदिवासी गीतांच्या माध्यमातून सहजीवनाची सुरुवात केली.

लग्न मंडपात नेहमीच कानी पडणारी चित्रपटातील गाणी आणि डी.जे.चा कर्णकर्कश आवाज या गोष्टीना फाटा देत समाज जागृती करणारे गीत गाऊन विवाह सोहळा तालुक्यातील चंदनखेडा येथे नुकताच पार पडला.लग्नात श्रीमंतीचा बडे जाव , पैशाचा नाहक अपव्यय व थाटमाट नव्हता. यावेळी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचा सत्कार केला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

सुत्रसंचालन अनिल हनवते यांनी केले.व प्रास्ताविक प्रशांत नन्नावरे यांनी केले. तर आभार देविदास चौखे यांनी मानले.कार्यक्रमाला आदिवासी समाजातील बंधू- भगीनी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजातील युवक , युवती, महिला, पुरुष बालगोपाल, गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.