अनोळखी युवकाचे आढळले शेगाव शेत तलावात प्रेत

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.7 जानेवारी) :- स्थानिक शेगाव बू आज अनोळखी युवकाचे प्रेत आढळल्याने गावात गाव परिसरात खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की शेगाव बू. ते वाघोली रस्त्यावर असलेल्या शेत तलावात आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास शेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेत तलावात एका इसमाचे प्रेत मृतदेह तरंगताना दिसले असता गावातील शेत शिवारातील शेतकऱ्याने पाहण्यास गर्दी केली होती दरम्यान हे मृतदेह अनोळखी असल्याने या मृतदेहाची ओळख पटणे कठीण झाले होते.

तेव्हा याची माहिती शेगाव येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांना दिली असता तात्काळ घटना स्थळ गाठून मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य सुरू केले व अखेर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा इथे हलविण्यात आला परंतु या मृत्देहाची अजूनही ओडख पटली नसल्याने पोलीस अधिकारी डोके खाजवत आहेत . सदर या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली psi श्री महादेव सरोदे , भीमराव पडोळे, नितीन कुरेकार , व अन्य पोलीस मोठ्या प्रमाणात चौकशी करीत आहे.