बुद्धिजीवीनि समाजाच्या उद्घनासाठी कार्य करावे. प्रा. संजय बोधे. Work for the opening of intellectual society..Prof. Sanjay Bodhe.

134

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.28 जून) :- छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रम 26 जून 2023 रोज सोमवारला विठ्ठल रुक्माई सभागृह ब्रह्मपुरी येथे बामसे फ च्या वतीने छत्रपती शाहूजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनीयर सीसी मेश्राम साहेब हे होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक संजय मगर सर आणि दुसरे प्रमुख मार्गदर्शक माननीय संजय बोधे सर वरोरा यांनी शाहू महाराज आणि त्यांच्या कार्याच्या संपूर्ण माहितीपट उभा केला ते म्हणाले की शाहूजी महाराजांनी बहुजन समाजातील वंचित घटकांसाठी शिक्षणाच्या सोयीपासून तर त्यांच्या जमिनीच्या उत्पादनाच्या वाढीसाठी प्रयत्न केला एवढेच नव्हे तर समाजामध्ये असणाऱ्या वाईट जोडी आणि परंपरेच्या विरोधात प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात दंड फुकणारा पहिला राजश्री होता आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की छत्रपती शाहूजी महाराजांची जयंती बहुजन समाजातील लोकांनी सणासारखी साजरी केली पाहिजे या कार्यक्रमा संचालन संचालन लोणारे सर यांनी केले .

या कार्यक्रमात वैजयंती ताई वाळके यांनी एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते कुटुंबामध्ये महिलांनी पुढाकार घेतला तर आपल्या कुटुंबाबरोबरच समाजामध्ये देखील महिला वर्गाच्या प्रयत्नाने फार मोठे परिवर्तन होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बामसेफचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक चंदन नगराडे यांचे व त्यांच्या सर्व टीमली प्रयत्न केले .

छत्रपती शाहूजी महाराजांच्या जयंती पिक्चर ंच्या झालेल्या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलावर्गांची उपस्थिती होती कार्यक्रम सायंकाळी दहा वाजेपर्यंत चालला त्यानंतर कौटुंबिक स्नेहभोजन यांचे देखील आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक चंदन नगराळे यांनी केले.