नाते आपुलकीचे संस्थे तर्फे कु.स्नेहा वाघमारे यांच्या शिक्षणासाठी २१,५०० रु ची आर्थिक मदत Financial assistance of rs.21,500 for the education of ms.sneha waghamare by Nate apulkiche sanstha

🔸पुन्हा जपले माणुसकीचे नाते

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadravati प्रतिनिधी) 

 भद्रावती (दि.9 एप्रिल) :- चंद्रपूर आणि परिसरातील अत्यंत गरजू लोकांना नाते आपुलकीची संस्था ही देवदूतासारखे काम करीत असून,अत्यावश्यक वेळी गरजूंना आर्थिक मदत होत असल्याने संस्थेचे कार्य डोळ्यात भरण्यासारखे झाले आहे.संस्थेने यापूर्वीही समाजातील गरजूंना केवळ दोन वर्षात वेळोवेळी पाच लाखाच्या वर आर्थिक सहाय्य केले आहे. 

यावेळी बाबूपेठ चंद्रपूर येथील *कु.स्नेहा शरदचंद्र वाघमारे* ह्या *एम.बी.बी.एस.* दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या होतकरू युवतीला एकवीस हजार पाचशे (२१,५००) रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने आणि एम.बी.बी.एस. सारख्या उच्च शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची आवश्यकता असल्याने संस्थेने केलेली ही अल्पशी मदत तिला खूप महत्त्वाची ठरणार आहे.

परिस्थितीवर मात करून स्नेहाने एम.बी.बी.एसचे पहिले वर्ष कसेतरी आपल्या जिद्दीने पूर्ण केले परंतु शिक्षणासाठी लागणारा पैसा जमविणे तिच्या पालकांना कठीण होत होते,अशात नाते आपुलकीचे संस्था शिक्षणासाठी मदत करते असे त्यांच्या कानावर पडले आणि संस्थेच्या काही सदस्यांशी त्यांनी संपर्क साधला,संस्थेच्या सदस्यांमध्ये चर्चा होऊन त्या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करायचे ठरले. 

संस्थेतर्फे चेक स्वरूपात ही मदत पोहचविण्यात आली,याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.किशन नागरकर,सचिव प्रा.प्रमोद उरकुडे,कोषाध्यक्ष इंजि.जयंत देठे,सदस्य श्री.सचिन बावणे आदी उपस्थित होते.