आदर्श शिंदें यांच्या गीत गायनाने तरूणाचे पाय खरोखरच थिरकावले काय

322

✒️ब्रम्हपुरी (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 ब्रम्हपुरी (दि.16 जानेवारी) :-  ब्रम्हपुरी येथे गेल्या तिन दिवसा पासून विवीध कार्यक्रम ,स्पर्धेच्या माध्यमातून ब्रम्हपुरीकरांना रिझवणाऱ्या ब्रह्मपुरी महोत्सवाचा काल चौथा आणि शेवटचा समारोपीय दिवस होता. सलग तीन दिवसाच्या आनंदोत्सवात काल प्रसिध्द मराठी गायक आदर्श शिंदे यांच्या धमाकेदार गीतांवर हजारोंच्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांना गायनाच्या तालावर ठेका धरायला भाग पाडले.

यात तरूण – तरुणीसह वायस्कांचा देखिल सहभाग घेतला. समारोपीय भाषणात माजी मंत्री वर यांनी भावनिकतेची साथ घालत संपूर्ण ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील व उपस्थित जनतेस मार्गदर्शन करून तुमचे माझे हे ऋणानुबंध कायमचे असणार असे प्रतिपादन केले.

        गुरुवार पासून सुरु झालेला ब्रम्हपुरी महोत्सवाची सांगता रविवारी झाली. या चार दिवशीय महोत्सवात कृषी प्रदर्शनी, शहर स्वच्छता, अदिती गोवीत्रीकर यांच्या रोड शो ने धमाल केली.

तर शहरातून निघालेल्या मिरवणुकीत अनेक झाक्या, वाद्य, देखावे आदीने शहर दुमदुमले होते. भव्य मॅरेथॉन स्पर्धा, आदेश बांदेकरांचा गृहमंत्री कार्यक्रम, तसेच इंडियन आयडियल विजेता सलमान अली व मनी यांच्या गायनाने तरूण तरुणींमध्ये उत्साह निर्माण करून धमाल केली.तर तिसऱ्या दिवशी पतंग स्पर्धा,नितेश कराळे यांचा युथ मोटोव्हेशन कार्यक्रम 

विद्यार्थ्यांच्या ठासून मनात भरला होता, सोबतच हास्य सम्राट सुनील पाल व स्थानिक कलावंतांच्या नृत्य स्पर्धेने भर घातली होती. अशातच महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील समाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 250 जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.तर महिलांसाठी कुकिंग कॉम्पिटिशन ठेवन्यात आली.

काल रात्रौ आदर्श शिंदे यांच्या गायनाने प्रचंड धमाल करून शेवटी डीजे च्या तालावर सर्वांनी ठेका धरला होता. या सर्व कार्यक्रमासाठी आमदार विजय वडेट्टीवार, युवक काँग्रेस प्रदेश सचिव शिवानी वडेट्टीवार, तसेच ब्रह्मपुरी उत्सव समिती मधील सर्व समिती पदाधिकारी व सदस्य तथा विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.