शेवटच्या माणसाचा उदय हाच ‘विकसित भारत संकल्प यात्रेचा’ संकल्प

🔹रामदास पाटील सुमठाणकर यांचे प्रतिपादन

✒️ गजानन लांडगे महागाव(Yavtmal प्रतिनिधी)

महागाव(दि.11 डिसेंबर) :- विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकार आपल्या दारी आले आहे. यात्रेच्या माध्यमातून आयुष्मान भारत, प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना,दीनदयाल अंत्योदय योजना, प्रधान मंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा, प्रधानमंत्री किसान सम्मान, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, जन धन योजना, अटल पेंशन योजना, महिलांसाठी धूरमुक्त स्वयंपाक उज्वल्ला गॅस योजना इत्यादी योजनाचा प्रसार व प्रचार करणे व योजनांची माहिती समाजातील शेवटच्या माणसाला देणे हा मुळ उद्देश असल्याचे प्रतिपादन रामदास पाटील सुमठाणकर यांनी केले.

आज हिंगोली विधानसभा क्षेत्रातील आडगाव मुटकुळे येथे “विकसित भारत संकल्प यात्रा” दाखल झाली होती. त्या प्रसंगी रामदास पाटील सुमठाणकर यांनी योजनांची सविस्तर माहिती दिली. पूर्व संघटन मंत्री भाऊराव देशमुख, आमदार तानाजीराव मुटकुळे,भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजीमामा शिंदे,बाबारावजी बांगर, के.के.शिंदे, नारायणराव खेडकर,तहसीलदार वगवाड साहेब, गटविकास अधिकारी बोथिकर साहेब,डॉ.कोरडे साहेब, सतीशदादा खाडे, सभापती हरीशचंद्र शिंदे, कैलास काबरा, गोल्डी सेठ, हमीद भाई, रजनीताई पाटील, शैलेश जैस्वाल, सरपंच ज्ञानोबा मुटकुळे, कार्यकारी अभियंता दाणे साहेब, पाटील साहेब, हमीद भाई प्यारेवाले,संतोषभाऊ टेकाळे, अमोल तिडके, अँड. अमोल जाधव, मंडळ अध्यक्ष माणिक लोढे, हिंमत राठोड, कांतराव घोंगडे,मनोज शर्मा आणि गावातील लाभार्थी, परिसरातील सरपंच उपस्थित होते.

१५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत ही यात्रा संपुर्ण भारत भर चालणार असल्याचे सांगून, जननायक बिरसा मुंडा जयंती दिवशी सुरु झालेल्या या यात्रेतून विविध केंद्रीय आणि राज्य योजनांची माहिती समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे हे यात्रेचे उद्दिष्ट असल्याचे सरकारचे धोरण आहे अशी माहिती रामदास पाटील सुमठाणकर यांनी दिली. या योजनाची माहिती प्रशासनाने जनतेपर्यंत काळजीपूर्वक पोहचवावी असे आवाहन सुमठाणकर यांनी केले.

विकसित भारत यात्रा यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे असे सांगून, योग्य लाभार्थी योजनांचा लाभ घेतील तरच विकसित भारत संकल्प यात्रा खर्‍या अर्थाने यशस्वी होईल. आज भारताचा तरुण मेहनत करून नवा भारत उभा करण्यासाठी मदत करत आहे ही बाब देशासाठी फार गौरवाची आहे.

आज घडीला मोदी सरकार कडून शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या योजनांची माहिती पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी,कामगार,महिला तसेच युवा वर्गाच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना सरकार राबवत आहे.

अंत्योदय म्हणजेच शेवटच्या माणसाचा उदय करणे हे सरकारचे ब्रीद आहे. आणि त्या प्रमाणे सरकार वाटचाल करीत असल्याचे आपण सर्वजण बघत आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाही दिवसाची सुट्टी न घेता देश सेवेस वाहून घेतलेले नेतृत्व आहे. आपणही मतदार म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने त्यांना देशसेवा करण्यास अजून ऊर्जा मिळते हे या निमित्ताने मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो असे रामदास सुमठाणकर म्हणाले. २०१४ आणि २०१९ ला आपण दिलेला मतदानरुपी आशीर्वाद अमुल्य आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत.

ही यात्रा आता महा जनआंदोलन बनली आहे. या गाडीला ‘मोदी की गॅरंटी वाली गाडी’ अशी उपमा मतदारांनी दिली आहे.

युवा पिढी तर विकसित भारताचे ब्रँड ॲम्बेसेडर बनले आहेत. सरकारी योजनांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनमानात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असल्याने सामान्य माणूस मोदी साहेबांच्या सोबत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. आगामी काळात भारत महाशक्ती होण्याच्या मार्गावर असून जनता जनार्दनाचा आशीर्वादपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार रामदास पाटील सुमठाणकर यांनी केला.