हेल्प फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे भाविक भाऊ भगत यांचा वाढदिवस साजरा

✒️ गजानन लांडगे महागाव (Yavatmal प्रतिनिधी)

महागाव (दि.14 नोव्हेंबर) :- हेल्पफाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे भाविक भाऊ भगत यांचा वाढदिवस महागाव उमरखेड विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ते यानी मोठ्या थाटामध्ये साजरा करण्यात आला.

 भाविक भाऊ भगत हे मागील दोन वर्षापासून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी बाहेर गावावरून आलेल्या रूगनाची अहोरात्र निष्काम सेवा करण्यासाठी व मदत करण्यासाठी धावून येतात .

त्यामुळे त्यांचा वाढदिवस सर्व सामान्य गोरगरीब शेतकरी वर्गाच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवस महागाव येथे सामाजिक कार्यकर्ते तथा कासारबहेल येथील माजी सरपंच श्री अशोकराव तुमवार यानी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

संजय कदम सुभम वानखेडे संकेत तुमवार सुनिल चव्हाण यांच्या समक्ष साजरा करण्यात आला.