ग्रामीण पत्रकारांनी कुणालाही न जुमानता सत्य मांडत निर्भिड पत्रकारीता करावी- खा. बाळूभाऊ धानोरकर

213

✒️ चंद्रपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.11 जानेवारी) :- पत्रकार हा समाजाचा दर्पण(आरसा) आहे. सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रात कार्य करणाèया लोकांसाठी आमच्या सारख्या लोकप्रतिनिधी साठी कर्तव्य पालनाचे दिशादर्शक म्हणून पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण असते. व्यवस्थेवर अंकुश घालणारा घटक म्हणूनही संपूर्ण समाज पत्रकारां विषयी सन्मानजनक दृष्टीकोन ठेवून असतो.

विश्वासपात्र घटक या नात्याने पत्रकार आणि पत्रकारीतेकडे बघितले जाते. त्यामुळे पत्रकार बांधवांनी निर्भीडपणे या स्तंभाची सेवा केली पाहिजे. ग्रामीण पत्रकारांवर जबाबदारीचे फार मोठे ओझे असल्याने त्यांनी कोणत्याही शक्तीचे दडपण येऊ न देता लेखनीतून सत्य आणि विधायक स्वरुपाची पत्रकारीता करून लोकशाही मुल्यांना बळकट करण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन खा. बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.

स्थानिक एन.डी हॉटेल येथे दि. ८ जानेवारी रोजी म.रा. ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर द्वारा आयोजित पत्रकार मेळावा व गुणवंत पाल्य व सेवाभावी पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. ग्रामीण पत्रकार संघाच्या प्रश्न आणि अडचणींची सोडवणूक करण्यासाठी सदैव प्रयत्न करू असे आश्वासन खासदार धानोरकरांनी आपल्या भाषणातून दिले.कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलनाने व महापुरुषांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

स्नेहल सिरसाट हिने स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर खा. बाळूभाऊ धानोरकर, आ. किशोर जोरगेवार, संघाचे राज्य कार्यकारीणी सदस्य गजानन वाघमारे, राजेश डांगरे, अविनाश राठोड, आ. अभिजित वंजारी, जिल्हा माहिती कार्यालयाचे विजय जाधव, अनंतराव गावडे, श्रमिक पत्रकार संघाचे मजहर अली, वेकोली चंद्रपूर क्षेत्राचे क्षेत्रीय अधिकारी श्री. संजय वैरागडे, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन, ज्येष्ठ पत्रकार संजय तायडे प्रभृतीची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांनी ग्रामीण पत्रकारांच्या आजवरच्या वाटचालीची माहिती विषद करताना ग्रामीण पत्रकार संघापुढील प्रश्न, त्यांच्या अडचणी विषद केल्या. ग्रामीण पत्रकारांना निर्भिडपणे पत्रकारीता करता यावी म्हणून शासनाने पत्रकारांच्या संरक्षणा प्रभावी कायदे करण्याची मागणी केली.

आ. किशोर जोरगेवार यांनी ग्रामीण पत्रकारांच्या राष्ट्र व समाज घडविण्यासाठीच्या योगदानाची मुक्तकंठाने प्रशंसा करीत पत्रकारीतेचा मुख्य दुवा असणाèया या पत्रकारांच्या न्यायोचित मागण्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात समस्यांचा डोंगर असतो. त्यामुळे समाजातील दारिद्रयात जीवन जगणाèया, रात्रंदिवस शेतात घाम गाळणाèया शेतकèयांचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचे महान कार्य ग्रामीण पत्रकार आपल्या लेखनीद्वारे करित असल्याने तोच खèया अर्थाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची सेवा करतो व तिचे संवर्धन करतो असे गौरवोद्गार काढले. 

याप्रसंगी मान्यवर अतिथीच्या शुभहस्ते हिमांशु पन्नासे (क्रीडा क्षेत्र), गुंजण आवारी (शैक्षणिक), वनिता धुमे (महिला सक्षमीकरण), स्नेहल शिरसाट(गायन),निशिका कामतवार (क्रीडा), रामकृष्ण रायपुरे (पत्रकारीवा व गीत गायन), चेतन शर्मा (सामाजिक क्षेत्र)यांचा पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनिल स्वामी, शंकर चव्हाण, मुमताज अली,अश्फाक शेख, लक्ष्मीकांत कामतवार, दुर्याेधन धोंगडे, जीवनदास गेडाम, नितिन बोदेले, सुरेश डांगे यांच्या पत्रकारितेतील अमूल्य योगदानां बद्दल सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन विनोद पन्नासे तर मान्यवरांचे आभार पुरुषोत्तम चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारीनितील सर्वश्री पी.एम.(कुक्कु) सहाणी, अनिल देठे, धर्मेश निकोसे, प्रकाश हांडे, प्रभाकर आवारी, धनराज कोवे यांनी विशेष परिश्रम घेतले.