बापुराव जी पेटकर ह्यांच्या प्रतिमेचे खासदार बाळू भाऊ धानोरकर ह्यांच्या तर्फे अनावरण

✒️ शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 शेगाव बू (दि.3 जानेवारी):- शेगाव बू येथील बापुरावजी पेटकर ह्यांच्या घरी त्यांच्या मुला मुलीने तसेच विकास ग्रुप, शेगाँव ह्यानी ‘कवितेचे घर’ बांधले.बापुरावजी पेटकर शिक्षक होते त्यांना कवितेची आवड होती. त्यांनी गोडी ने आपल्या विद्यार्थ्यांना कविता शिकवली. त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना साहित्याची आवड निर्माण झाली.

भविष्यात सुद्धा विद्यार्थ्यांना साहित्यात आवड निर्माण व्हावी ह्या उद्देशाने त्यांच्या मालकी हक्क असलेल्या घराचे नव निर्माण करण्यात आले आणि त्याठिकाणी कवितेचे घर निर्माण केल्या गेले. आता गावाची ओळख कवितेचे घर असलेले गाव अशी होत आहे.

ह्या निमित्ताने कवितेच्या घरी बापुरावजी पेटकर ह्यांच्या प्रतिमेचे अनावरण खासदार श्री बाळू भाऊ धानोरकर ह्यांच्या तर्फे करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती वरोरा मतदार संघाच्या आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर ह्या उपस्थित होत्या. तसेच कृषी समिती चे सभापती राजेंद्र चिकटे उपस्थित होते. 

ह्यावेळी बोलताना श्री धानोरकर म्हणाले की गुरुजींनी चांगले शिक्षण दिले म्हणुनच त्यांचे विद्यार्थी अजूनही गावासाठी काही करतात. विकास ग्रुप त्याचाच एक भाग आहे त्यामुळे विकास ग्रुपचे कामाचे तसेच कवितेच्या घराचे त्यांनी ह्यावेळी कौतुक केले. 

ह्यावेळी कार्यक्रमाला डॉ माधुरी मानवटक र, ब्रह्मानंद पेटकर,मधुकर पेटकर, किशोर पेटकर, नितीन वैद्य, देवराव कांबळे ह्यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन अनंत आखाडे,, प्रास्ताविक किशोर पेटकर तर आभार प्रदर्शन अर्चना लोडे ह्यानी केले.

विकास ग्रुप तर्फे दोन्ही मान्यवराचा सत्कार करण्यात आला.ह्यावेळी मराठी शाळेतील विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते.ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत रामटेके, रंजना रामटेके, गीताताई फुलकर, अमोल दात र कर, अमोल ठाकूर, वंदना वाढई, प्रकाश पेटकर, पुष्पांजली काप टे तसेच वनिता मा को डे ह्यानी विशेष मेहनत घेतली.