आमदार प्रतिभाताई यांच्या वाढ दिवसा निमित्याने .आरोग्य शिबिराचे भव्य आयोजन

🔸हजारो रुग्णांनी घेतला लाभ 

🔸खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन

✒️शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.2 जानेवारी):-स्थानिक शेगाव बू येथे आज परिसरातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आमदार मान.सौ . प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसा चे ओचीत्य साधून वरोरा तालुक्यातील अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले तर आज शेगाव येथील शिवम सभागृह येथे चंद्रपूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले मानवटकर हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी डॉ माधुरी मानवटकर यांच्या समूह सह सर्व वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात स्थानिक शेगाव तसेच परिसरातील अनेक गावातील रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून औषोध उपचार घेतले .

यात अनेक रुग्णांनी आपले बीपी , शुगर , घुटण्याचे आजार , अश्या विविध अनेक आजारावर उपचार करण्यात आले . यात स्थानिक शेगाव येथील रुग्ण तसेच परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घेतला .

वरोरा तालुक्यातील शेगाव बू ही मोठी बाजारपेठ आहे शिवाय माझ्या साठी हा परिसर माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या करिता या परिसरातील शेतकरी शेतमजूर हा कोणत्याही आजारापासून त्रस्त राहायला नको सर्व नागरिक सदृढ राहून त्यांना सदैव मोफत आरोग्य सेवा मिळावी तसेच आमदार खासदार निधीतून दीड लाख रुपयां पर्यंत खाजगी इलाज करण्यास सोय उपलब्ध करून देऊ. जनसेवा हीच ईश्वर सेवा हेच ब्रीद वाक्य लक्ष्यात घेऊन तालुक्यात माझ्या वाढ दिवसाच ओचित्य साधून आरोग्य तपासणी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार मान. श्री बाळूभाऊ धानोरकर उपस्थित होते . प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा श्री राजुभाऊ चिकटे , श्री डॉ. मिस्त्री. डॉ. माधुरी मानवटकर, ठाणेदार श्री अविनाश मेश्राम, डॉ. शालिक झाडे प स सदस्य वरोरा. श्री विजय आत्राम , तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याचेच ओचित्य साधून गावात शेती मध्ये प्रगती केली. , सामाजिक शेत्रात विशेष सहकार्य करून जन सेवा केली , तसेच गोर गरीब जनतेला अहो रात्र आरोग्य सेवा सेवा करणाऱ्या डॉक्टर ताजने मॅडम , अश्या विविध कार्यात सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पठाण साहेब यांनी केले तर आभार कोटकर यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगेश खामनकर , हरिष जाधव , चंदूभाऊ जयस्वाल , अन्य कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले…..