स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर द्वारा निःशुल्क बससेवेद्वारे रुग्ण निघाले पुढील उपचाराला 

245

✒️वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.30 डिसेंबर) : – स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर तथा शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून २६ डिसेंबरला मोफत भव्य हृदय रोग व सर्व रोग निदान शिबीर संपन्न झाले . या शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांना पुढील उपचाराकरीता वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात आज (दि.30) ला पाठविण्यात आले.

श्रद्धेय बाबा आमटे जयंती निमित्त २६ डिसेंबर रोजी ‘श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत वरोरा येथील साई मंगल कार्यालयात हे शिबिर संपन्न झाले या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सदर शिबिराचा जवळपास एक हजार नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरात तपासणी केलेल्या काही रुग्णांची आवश्यकतेनुसार सावंगी मेघे येथील रुग्णालयात अगदी स्वस्त दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच शिबिरात रोग निदान झालेल्या रुग्णांना स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर द्वारा संपूर्ण मदत केल्या जाणार आहे. 

  श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियानाअंतर्गत यापूर्वी खांबाडा, कोंढा, पीपरी , पिपरी (दे.) येथे आयोजित शिबीरामध्ये तपासणी झालेल्या रूग्णाची आचार्य विनोबा भावे ग्रामिण रूग्णालय, सावंगी मेघे, वर्धा येथे पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये उपचार करण्यात आलेले रुग्ण शिवण नक्षिने, शिल्पा भोस्कर, पांडुरंग येरमे, महेंद्र भोंगळे, प्रणाली कुत्तरमारे यांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर व्दारे करण्यात आला हे विशेष . 

  श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियानाअंतर्गत आयोजित शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या रुग्णना पुढील उपचार करीता व उत्तरीय तपासण्यासाठी आज ( (दि.30)ला द्वारा निःशुल्क बससेवेद्वारे रुग्णालयात पाठविण्यात आले . यावेळी विनोद मालू , चंद्रकांत दांडेकर , दत्ता बोरेकर, मुन्ना शेख , संजय दानव , आशिष घुमे , तुळशीदास आलाम, अभिजित टिकले , राहुल बल्की , युवराज इंगळे , अमोल लढी हे उपस्थित होते बसला हिरवी झेंडी दाखवून बस सोडण्यात आली .