आमदार – खासदार यांच्या वेतनात वाढ

318

🔸मात्र घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ नाही 

🔸महागाई फक्त लोकप्रतिनिधी साठीच काय प्रहार सेवक विनोद उमरे यांचा प्रश्न 

✒️ चंद्रपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.28 डिसेंबर):- चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनतेचे प्रतिनिधींनी जनतेच्या समस्या कडे लक्ष देणे गरजेचे सध्या रमाई शबरी घरकुल योजना,पंतप्रधान आवास योजना यशवंतराव चव्हाण घरकुल योजना केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून घरकुल योजना राबविण्यात येत आहे.

बांधकामासाठी लागणारे साहीत्य (मटेरियल)चे भावात दोन ते तीन पट वाढ झाल्याने घरकुल बांधणे शक्य नाही परंतु २०१६.१७ पासूननची अनुदान रक्कम २०२२.२३.मध्ये आजही तिच आहे परंतु आमदार खासदार यांचे पगार जोमात वाढतात.

सध्याच्या वाढलेल्या महागाईनुसार मंजूर अनुदान रक्कम पुरेशी नाही त्यामुळे बरेच घरकुल अपूर्ण आहे म्हणून सदर मंजूर रक्कमेत डबल वाढ करण्यात यावी याकरता जनतेच्या प्रतिनिधींनी शासन स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे जनतेच्या प्रतिनिधींनी यावर लक्ष केंद्रित करावे व शासन स्तरावर पाठपुरावा करून गरजू लाभार्थ्यांना वाढत्या महागाईच्या काळात घरकुल तयार करण्यात मदत होईल असे आव्हान प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केले आहे….