चारगाव सोसायटीत धान खरेदीला प्रारंभ 

✒️ शेगाव बु (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.27 डिसेंबर):-स्थानिक वरोरा तालुक्यातील चारगाव बू येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित चारगाव बू येथे परिसरातील सर्व शेतकऱ्याच्या शेतमालाचे खरेदी विक्री सुरू केली असून आज येथील शेतकरी श्री सुरेश डोळस यांची धान खरेदी करून शुभारंभ करण्यात आला. 

     दरवर्षी प्रथम धान्य विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ टोपी प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येतो यावर्षी दे यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले .

शिवाय परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी धान विक्री करण्यास संस्था मध्ये ये करावे असे सुधा आवाहन करण्यात आले .

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित चारगाव बू र. न.607 येथे आधार भुत धान खरेदीचे उजघाटन झालेले आहे माननिय सभापती श्री.दयाराम तुकाराम नन्नावरे,उपसभापती श्री. अभिजीत गिरिधर पावडे यांच्या हस्ते शेतकर्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले तसेच वजन काटा यावर मलारपण करून प्रगतीचा नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संचालक मंडळ श्री.नरेंद्र केशव गरमडे,श्री.श्रावण मारोती जीवतोडे श्री.शत्रुघ्न राघो हनवते,श्री.विनायक तुकाराम दडमल,श्री.विजय मारोती चौधरी,श्री.केशव देवाजी देशमुख ,श्री.शंकर बापूराव खाडे,श्री. छगन उद्धव आडकिने ,श्री. सिध्दार्थ मारोती थुल,श्रीमती. इंदुबाई नागराज रनदिवे,श्रीमती.निशा संदीप चौधरी इत्यादी संचालक मंडळ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.