संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन वाढ Sanjay Gandhi Destitute Grant Scheme and Shravanbal Seva State Pension Increase

????प्रतिमाह ३ हजार रु. मानधन करण्याची आ. प्रतिभाताई धानोरकर यांची मागणी(3 thousand per month Rs. To pay Pratibha and Dhanorkar’s demand)

✒️शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.7 जुलै) : – संजय गांधी निराधार योजना आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांना प्रतिमाह रुपये 1000 एवढे अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये आता 500 रुपयाची वाढ करून आता एकुण प्रतिमाह रुपये 1500 इतके अनुदान लाभार्थ्यांना मिळते.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वेळोवेळी हा प्रश्न विविध आयुधांच्या माध्यमातून लावून धरला असून याला आता यश आले आहे. ५ जुलै २०२३ रोजी शासनाने शासन निर्णय जारी केला आहे. परंतु यात आणखी वाढ करून प्रतिमाह ३००० हजार रुपये प्रतिमहा मानधन देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 

वृद्धापकाळात आर्थिक आधार म्हणून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन शासनाच्या माध्यमातून देण्यात येते. आजवर हे मानधन एक हजार रुपये देण्यात येत होते. मात्र या अल्पमानधनात गरजा भागवणे शक्य होत नाही.

त्यामुळे वेळोवेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत विविध आयुधांच्या माध्यमातून या मानधनात वाढ करण्याची विनंती केली होती. आता शासनाने परिपत्रक काढून ५०० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु वाढती महागाई लक्षात घेता प्रतिमहा ३००० हजार रुपये मानधन देण्याची मागणी लावून धरणार असल्याची माहिती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली.