प्रहार सेवकांनी सहा बॉटल रक्त देऊन वाचवले रुग्णाचे प्राण

✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.27 डिसेंबर):- तालुक्यातील कोसरसार येथील सरपंच गणेश मडावी उपसरपंच अमित बहादुरे प्रहार सेवक गणेश उराडे व इतर प्रहार सेवकांनी गावातील एका रुग्णाला सहा बॉटल रक्त देऊन प्राण वाचवले. 

मारुती उद्धव बावणे रा कोसरसार हे भगंदर च्या ऑपरेशन साठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णाल्यात दाखलं झाले असता त्याच ऑपरेशन सक्सेस झाले असता डॉक्टर यांनी ब्लड ची गरज आहे तुम्ही ब्लड मागवून द्या असे सांगितले. रुग्णांनी आपल्या गावातील सरपंच गणेश मडावी उपसरपंच अमित बहादुरे यांना फोन केला त्यांनी सहा बॉटल ची ववस्था करून त्या रुग्णाचा जीव वाचवला.

प्रहार सेवक नेहमी ब्लड कॅम्प राबवून एक समाजिक सदेश समाजात देतात दरवर्षी प्रत्येक गावात ब्लड कॅम्प राबवून अनेक रुग्णांना आता पर्यत ब्लड ची गरज पूर्ण करून दिली नागपूर येथील आयुष ब्लड बँक चे राहुल भाऊ यांना कॉल करून ज्या रुग्णांना ब्लड ची गरज भासते त्यांच्या कडून कोणताही मोबदला न घेता त्यांना सरळ हाताते मदत करतात अस्या ह्या प्रहार सेवकांचे रुग्णांनी आभार मानले सर्व स्तरावरून प्रहार सेवकाचे कौतुक होत आहे