श्री संत शिरोमनी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्य कोसरसार येथे निघाली भव्य मिरवणूक

✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.22 डिसेंबर) :- तालुक्यातील कोसरसार या गावी तुकाराम महाराजांच्या मूळ गाथेचे लेखक तेली समाज विभूषण श्री संत जगनाडे महाराज यांच्या मंदिरात २० तारखेला घटस्थापना करून २१ डिसेंबर ला सकाळी महाराजांच्या पादुकाची भव्य मिरवणूक काढण्यात आली

     महाराजाच्या पादुकाच्या दिंडी सोबत अनेक भजणी मंडळ, बँड पथक, अश्व पथकाची भव्य शोभयात्रा तेली समाज कोसरसार कडून काढण्यात आली. ही शोभयात्रा संताजी महाराज मंदिर येथून निघून गावप्रदक्षिणा कडून संताजी महाराज मंदिर येथे समाप्त झाली.

त्यानंतर दुपारी ह.भ.प.प्रवीण महाराज काटकर यांचे काल्याचे कीर्तन ठेवण्यात आले काला झाल्यानंतर लगेच गावभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. आणी २२ तारखेला धूळ विसर्जनानी पुण्यतिथी ची सांगता झाली या कार्यक्रमात गावातील सर्व नागरिक तसेच इतर गावातील सर्व तेली बांधवानी उपस्तीथी दर्शविली .