पितृछत्र हरविलेल्या चिमुकल्या सानवी च्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आता ट्रस्टची : प्रा. धनराज आस्वले The trust is now responsible for the further education of the child Sanvi, who lost her father’s child: Prof. Dhanraj Aswale

????स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत ट्रस्टनी घेतले वेदांत आणी सानवीला शैक्षणिक दत्तक(self Under the Sindhutai Sapkal Educational Adoption Scheme, the trust adopted Vedanta and Sanvi for educational purposes)

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.11 जुलै) :- स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर व्दारा राबविण्यात येत असलेले उपक्रम, आरोग्याविषयक श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान, सामाजिक प्रबोधन विषयक विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन सामाजिक उपक्रम, क्रिडा, खेळ स्पर्धा विषयक  कै. म. ना. पावडे क्रिडा स्पर्धा तसेच गोरगरीब मुलांच्या शिक्षणासंबंधी अनाथाची माय स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना.

याच स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना अंतर्गत वेदांत सुधीर नगराळे व सानवी सानवी सुधीर नगराळे या दोन्ही भाऊ बहीणीला ट्रस्टनी शिक्षणाकरीता दत्तक घेतले. यांचे यापुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी ट्रस्टनी स्विकारली असे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले म्हणाले.

सुधीर नगराळे हे भद्रावती येथे व्यवसाय करायचे. आजारामुळे निधन पावले. पत्नी आणी दोन मुले असा परीवार. पितृछत्र हरवल्याने वेदांत व सानवीच्या आई विशाखा सुधीर नगराळे यांनी जबाबदारी स्वीकारत छोटासा झेराक्स मशिनच्या माध्यामातून प्रपंच पुढे सुरू ठेवत पालन पोषण करीत आहे.

अशातच आर्थिक परीस्थीती व्यवस्थीत नसल्याने मुलांच्या शिक्षणाची चिंता वाटू लागल्याने स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर व्दारा राबविण्यात येत असलेले स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेची मिळालेल्या माहीतीच्या आधारे ट्रस्टसोबत संपर्क साधत मुलांच्या शिक्षणाकरीता सहकार्य मागीतले. सर्व परीस्थीती बघता पालक विशाखाला ट्रस्टच्या माध्यामातुन पाल्याच्या शिक्षणाची जबाबदारी ट्रस्ट घेत असून यापुढील सर्व शिक्षण हे ट्रस्ट करून देईल असे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी शब्द दिला. 

वेदांत व सानवी यांना शालेय पुस्तके, वह्या, गणवेष, शैक्षणिक साहीत्य प्रा. धनराज आस्वले व  सदस्या सुषमा शिंदे यांनी प्रदान केले तसेच शाळेचे शुल्क ट्रस्ट शाळेला ट्रस्टच्या बॅक खात्यातुन धनादेशाद्वारे प्रदान करण्यात येत आहे.         

यावेळी ट्रस्टचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले,  सदस्या सुषमाताई शिंदे, दत्तक विद्यार्थ्यांचे आई विशाखा सुधीर नगराळे व इतर मंडळी उपस्थित होते.