सावकारी कर्ज व बोगस विक्रीपत्र करून शेतकऱ्यांची फसवणूक

658

🔸कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणारी टोळीवर कारवाई करण्याची मनसेची मागणी

✒️वरोरा(विदर्भ प्रतिष्ठा न्युज नेटवर्क)

वरोरा(दि.16डिसेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बनावट विक्री व सावकारी कर्जाच्या नावाखाली विक्री करून हडप केल्याने सिद्धार्थ ढोके, चिरकुटा ढे’गळे व इतरांनी घेतलेल्या सर्व रजिस्ट्री रद्द करून दोषींवर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा अशी मागणी मनसे तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून केली आहे. दरम्यान यावेळी स्थानिक हॉटेल रॉयल प्लाझा घेतलेल्या पत्रकारपरिषद मधे वरोरा भद्रावती तालुक्यातील पिडीत शेतकरी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेजमिनीची बनावट विक्री करून व सावकारी कर्जाच्या मोबदल्यात शेतजमिनीची विक्री दाखवून शेतजमीन हडप करणारी टोळी सिद्धार्थ महादेव ढोके राहणार कर्मवीर वार्ड वरोरा यांच्या पुढाकाराने मागील अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. या टोळीत चिरकुटा उर्फ अविनाश गोपाळा ढे’गळे राह. चिनोरा ता. वरोरा यांनी नुकतिच या प्रकरणी एका शेतकऱ्यांना मारहाण केल्या प्रकरणी त्यांना अटक होऊन कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली होती.

त्यांच्या या टोळीत किरण दत्तात्रय तुरानकर रा. शिवाजी वार्ड वरोरा, अशोक नानाजी पारखी राह. राजेंद्र प्रसाद वार्ड, रवींद्र वाल्मिकीराव डोंगरे राह. खांजी वार्ड वरोरा. आशा अरविंद चौधरी राह. मोहबाळा ता वरोरा. गोविंद मनोहरदास तेला राह. सहकार नगर चंद्रपूर. विजय डोमाजी भोले, विनोद कवडू चांभारे राह. हनुमान वार्ड वरोरा इत्यादीचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या या टोळीत काही साक्षीदार हे नेहमीच तेच ते आहेत जे कमिशन खाण्यासाठी यांच्यासोबत असतात.

शेतकऱ्यांची शेतजमीन सावकारी कर्जाच्या नावाखाली रजिस्ट्री करून शेतजमिनी हडपणाऱ्या टोळीने सुनीता गोविंदा आंबाडे, धनराज मारोती आंबाडे चिनोरा. पंढरी महादेव गौरकार राह. गिरोला, बाबुराव नारायण ठावरी राह, पानवडाळा तालुका भद्रावती. नारायण नत्थु ठमके राह. दहेगाव ता. वरोरा, गौरव नानाजी लुच्चे राह. शेगाव (बु ) ईश्वर नामदेव टापरे राह पोहा ता वरोरा. विनोद थेरे डोंगरगाव ता भद्रावती, उत्तम चिंचोलकर राह. बांद्रा ता वरोरा इत्यादी शेतकरी लोकांची फसवणूक केली अंगे व या प्रकरणात अनेकांवर कलम 420 अंतर्गत फसवणूकीचे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले पण ज्याअर्थी छल कपट व बळजबरी करून जमिनी विक्री करण्यात आल्या त्या विक्रीपत्राला रद्द करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली तर काहींनी तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करून न्याय मागितला पण तरीही पिडीत शेतकरी अजूनपर्यंत न्यायापासून वंचित आहे.

ग्रुहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की पिडीत शेतकऱ्यांच्या फसवणुकीला वरोरा भद्रावती या तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय जबाबदार असून एकाच शेतजमिनीची दोन दोन वेळा रजिस्ट्री झाल्याचे प्रकरण सुद्धा समोर आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या फसवणुकीला स्थानिक प्रशासन सुद्धा जबाबदार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. वरील टोळीतील काहींनी शेत एकाचे दाखवून दुसऱ्या शेताची रजिस्ट्री सुद्धा केल्याच्या घटना समोर आल्या असल्याने पोलीस प्रशासनाकडे अनेक तक्रारी याबाबत करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे गोरगरीब, कर्जाच्या बोझ्याखाली दबलेला शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्गावर असल्याने आपण तातडीने या प्रश्नावर लक्ष घालून शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करावे व ज्या शेतकऱ्यांची बोगस रजिस्ट्री व सावकारीच्या नावाखाली रजिस्ट्री करून जी फसवणूक केली.

त्या शेतकऱ्यांच्या सर्व रजिस्ट्री रद्द कराव्या व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या नागपूर च्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा काढण्यात येईल यांची नोंद द्यावी या दरम्यान कुणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्यासाठी आपले शासन प्रशासन जबाबदार पकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यास न्यायालयात दाद मागू असा इशारा मनसे तर्फे देण्यात आला आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के व पिडीत शेतकरी उपस्थित होते.

चौदा वाड्या अन् एक स्मशानभूमी