![](https://vidarbhapratishtha.in/wp-content/uploads/2025/02/IMG-20250215-WA0137.jpg)
६ जुगारींना अटक .५ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि .29 जानेवारी) :- बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येनबोडी येथील झुडपात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ५ दुचाकी, रोख रक्कम व पत्ते असा ५ लाख ३२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ६ आरोपींना अटक केले. २६ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.
२६ जानेवारी रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे सह पोलीस कर्मचारी ग्रामीण भागात सांस्कृतिक कार्यक्रम निमित्ताने पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, येनबोडीच्या झाडाझुडपात जुगार सुरू आहे. त्याआधारे पोलीस पथकाने छापा टाकून राजेश शंकर जोनापुरी (२८) कळमना , वैभव रवींद्र मोरे (२५) कळमना, दिलीप एकनाथ देवाळकर (४५) आमडी, सिनु चंद्रय्या जक्कलवार (४०) बामणी, अरविंद सुंदरशाह सिडाम (३८) कवडजई, प्रशांत हरी झाडे (२६) रा. कळमना याला पत्ते जुगार खेळताना पकडण्यात आले. छाप्यादरम्यान पोलिसांनी ५ दुचाकी, रोख रक्कम २२ हजार ५०० रुपये व ५२ पत्ते जप्त करून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केले.
सदर कारवाई बल्लारपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सफौ आनंद परचाके, पो हवा रणविजय ठाकुर, सत्यवान कोटनाके, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, पोअं विकास जुमनाके, पोअं मिलिंद आत्राम यांनी केले.
![](https://vidarbhapratishtha.in/wp-content/uploads/2023/01/IMG-20230113-WA00011.jpg)