भटाळा येथे महाशिवरात्री निमित्त तीन दिवसीय भव्य यात्रेचे आयोजन

Share News

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू.(दि 8 मार्च) :- चंद्रपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेले शिल्प ग्राम भटाळा हे गाव शिल्पग्राम असून या गावाची इतिहासात नोंद आहे इथे भव्य जगात सर्वात मोठी असलेली पुरातन शिवलिंग विराजमान आहे त्यावर भव्य दिव्य मंदिर आहे याचं सोबत भवानी मातेचे मंदिर आहे याचं सोबत ऋषी तलाव आहे यात अनेक छोटे मोठे शिल्प आहे तसेच गावात तसेच गाव परिसरात अनेक प्रकारच्या शिल्प मूर्ती पाहायला मिळते . दरवर्षी महाशिवरात्री निमित्याने भव्य यात्रा भरते . व हर हर महादेव च्या जय घोषणे भटाळा नगरी न्हाहून निघत असते. 

      या वर्षी देखीलभव्य दिव्य तीन दिवसीय यात्रेचे आयोजन केले होते.

ग्रामपंचायत भटाळा अंतर्गत मौजा भटाळा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक 8 – 9 – 10 मार्च 2024 रोज शुक्रवार, शनिवार, व रविवार या तीन दिवशी महाशिवरात्री यात्रेचा भटाळा नगरीमध्ये फार मोठा उत्सव असतो.

या भटाळा गावामध्ये हेमाडपंथी पुरातन शिव मंदिर तथा इतर शिल्प ग्राम पुरातन वास्तू आढळून येतात. या शिव मंदिराला भोंडे महादेव मंदिर या नावाने ओळखले जातात. या मंदिरामध्ये दिनांक 8 मार्च 2024 रोज शुक्रवार ला सकाळी 5:00 वा घटस्थापना व आरती होतात दिनांक- 09 मार्च 2024 रो शनिवार ला रात्री 3:00 वा नंदीवर स्वार झालेले श्री शंकर जी यांची रथ मिरवणूक निघतात यामध्ये अनेक भजन दिंड्या सहभागी होतात व दुपारी 11:00 वा महाराजांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आणि दिनांक- 10 मार्च 2024 रोजी दुपारी 11:00 वा ह भ प महाराजांचे काल्याचे कीर्तनाचा कार्यक्रम होतो नंतर दुपारी 5:00 वाजता सर्व यात्रेकरूंना भाविक भक्तांना महाप्रसादाचा कार्यक्रम होतो.

   या यात्रेमध्ये तीन दिवशी लाखो भाविकांची गर्दी असतात या संपूर्ण यात्रेची नियोजन ग्रामपंचायत भटाळा यांच्याकडे असतात. सदर यांचे नियोजन व्यवस्थापन कार्य सरपंच कु. धम्मकन्या प्रकाश भालेराव व उपसरपंच श्री हरिदासजी रघुनाथ जाधव व सर्व सदस्य गण यांच्याकडे असते लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायत कडून मोफत आरोग्य तपासणी ही शासकीय आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दुकाने रांगेत लावण्याची व्यवस्था,मनोरंजन कार्यक्रमाची व्यवस्था, तसेच पोलीस मदत तिची व्यवस्था, विद्युत व्यवस्था , भाविकांना रांगेत दर्शन घेण्याची व्यवस्था, भाविकांना दर्शनाकरिता येण्या जाण्याची व्यवस्था वरोरा एसटी डेपो यांच्याकडून ग्रामपंचायत ने केलेली असते 

“लाखो भावकांची व्यवस्थेचे कार्य ग्रामपंचायत भटाळा दरवर्षी करीत असतात. तसेच यात्रकरूच्या हितासाठी तसेच दुकानदार बांधवांसाठी पिण्याचे पाणी. त्यांची व्यवस्था सुखरूप केली जाते त्यामुळे भाविकांना शिव मंदिर भटाळा येथील महाशिवरात्री यात्रेचा आनंद मोठया उत्साहाने भाविक घेत असतात. त्याकरिता पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात येतो जेणे करून काही विपरीत परिणाम होणार नाही याची मुख्य दक्षता घेतली जाते”….श्री हरिदास रघुनाथ जाधव उपसरपंच ग्रामपंचायत भटाळा.

Share News

More From Author

प्रा. आ. केंद्र शेगाव बू. च्या नवीन इमारतीचे आ. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन

कार नाल्यात कोसळून अज्ञात चालकाचा होरपळून मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *