शिवजंयती निमित्त पिर्ली येथे ग्राम स्वच्छता अभियान राबवित छत्रपतीना वाहली आदरांजली

Share News

🔸पिर्ली येथे शिवजयंती निमित्त शालेय विद्यार्थ्याकरीता सामान्य ज्ञान परिक्षेचे आयोजन

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadarwati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.20 फेब्रुवारी) :- तालुक्यातील पिर्ली येथे ज्यांची प्रेरणा ऊर्जेचा स्त्रोत असून तो अनेक पिढयांसाठी मार्गदर्शक असलेले असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त् शिव छत्रपती युवा प्रतिष्ठान संस्थेव्दारे गाव स्वच्छता अभियान राबवीत तसेच लहान मुलांकरीता सामान्य ज्ञान परीक्षा घेत छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहून जयंती साजरी करण्यात आली.

 19 फेब्रुवारी] रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. यानिमित्ताने देशभरात शिवजयंती साजरी करण्यात येते. अशातच भद्रावती तालुक्यातील पिर्ली येथेसुध्दा शिव छत्रपती युवा प्रतिष्ठान संस्थेनी अनोख्या पध्दतीने शिवजयंती साजरी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिर्ली सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विष्णुदास मत्ते तसेच सरपंचा वर्षा तराळे, उपसरपंच नेताजी पिंपळशेंडे, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश कुत्तरमारे, पोलीस पाटील विनो देरकर, मधमाशी प्रशिक्ष्ज्ञक दत्तु येरगुडे, कोतवाल प्रफुल लांबट, प्रतिष्ठीत नागरीक मुर्लीधर नागरकर व गणमान्य व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पिर्ली येथेल पोस्टमन श्रीरंग ठेंगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सकाळी ग्राम स्वच्छता अभियान राबिवण्यात आले. शिव छत्रपती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखील तरारे, उपाध्यक्ष महेश येरगुडे, सचिव राकेश मुळे तसेच सदस्य अंकित येरगुडे, निखिल काकडे, शुभम मत्ते, निलेश येरगुडे, सचिन मत्ते, सचिन देठे, गणेश खेडकर, कुणाल येरगुडे, सुरज मुळे, शुभम काकडे, संदिप मडावी, धिरज कोलते, संकेत सातपुते व इतर सदस्यांनी गावातील लोकांना सहभागी करीत गावातील रस्ते, नाली यांची सफाई करीत ग्राम स्वच्छता अभियान राबवीले.

 शिवजयंती निमित्त दुपारी एक वेगळा उपक्रम हाती घेत गावातील वर्गगट अ 4 ते 7 पर्यंत तसेच वर्गगट ब 8 ते 10 पर्यंत विद्यार्थ्यांकरीता सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. यात अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरीता बक्षीस सुध्दा वितरण करण्यात आले. अ गटातुन प्रथम आलेला पवन तराळे, व्दितीय आलेला सर्वोज्ञ पुरी तसेच तृतिय क्रमांक पटकावलेले रुद्र तराळे आणी साहिल देठे तथा ब गटातुन प्रथम असलेली रामेश्वरी आसुटकर, दिव्तीय प्रथम पुरी व तृतीय आलेला प्रथमेश मडावी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारीतोषीके वितरण करण्यात आली. सामान्य ज्ञान परीक्षा सुरळीत पार पाडण्याकरीता आयोजक प्रतिष्ठानचे सदस्य श्रीओम शेंडे, श्रीकांत कोलते, अनिल भुसारी, संकेत दाभेकर, समिर दाभेकर, संकेत मत्ते, राहुल मत्ते, अनिकेत सातपुते, अक्षय कुळमेथे, हर्षल काकडे, प्रज्वल काकडे, करण कोलते, राकेश कोलते, सतिश पुरी, शंकर खवसे, प्रविण मुळे, प्रतिक डाखरे, अतुल डाखरे व आयोजक सदस्यांनी सहकार्य केले.

 सदर शिवजयंती कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करीत गावात एक वेगळयाप्रकारे कार्यक्रम घेत शिवजयंती साजरी केल्याबद्दल शिव छत्रपती युवा प्रतिष्ठान, तुकडोजी क्रिडा मंडळ तसेच श्री साई मंडळ पिर्ली यांचे कौतुक केले.

 सदर कार्यक्रमाच्या यश्सवितेकरीता आयोजक मंडळातील सदस्य संदीप करीये, उत्तम काकडे, प्रविण मुळे, आकाश बावणे, रोहीत कोलते, धुप तरारे, गजु डाहुले, लोकेश येडमे, राहुल कामडी, मुर्लीधर खेडेकर, सोनु धोंगडे, राहुल देठे, रमेश आत्राम, आकाश कामडी, प्रशांत आत्राम, संकेत येडमे, आकाश आसुटकर, राहुल पारखी, अजय धोंगडे, मोहन वाढई, श्रीकांत येरगुडे यांनी विशेष मेहनत घेतली.

 शिव छत्रपती युवा प्रतिष्ठान, तुकडोजी क्रिडा मंडळ तसेच श्री साई मंडळ पिर्ली यांनी प्रमुख पाहुणे, गावकरी मंडळी तसेच कार्यक्रमास उपस्थितांचे शब्दसुमनाने आभार व्यक्त केले.

Share News

More From Author

चंदनखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली

गाव चलो अभियानाच्या अंतर्गत कोरपणा तालुक्यातील मौजा वनसडी बूथ क्र. 52 वर प्रवास दौरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *