✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.29 ऑगस्ट) :- आर्णी तालुक्यातील संत नगरी तळणी येथे ब्रह्मलीन पूज्यसंत शांताआई यांच्या २६ वा पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या पवित्र पुण्यस्मरण सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी पावन स्थळी संतशांताआईचे दर्शन घेतले. याप्रसंगी श्रोत्यांना मनोमन एक विलक्षण शांती आणि अध्यात्मिक ऊर्जेचे समाधान अनुभवायला मिळाले आहे.
या पवित्र ठिकाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन रामनामाचा अखंड जप केला. “रामनाम” च्या गजराने वातावरण दुमदुमले होते. आणि त्या भक्तिमय जपातून संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारावून गेला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे साहेब, खासदार प्रतिभाताई धानोरकर, खा. संजय देशमुख, ह.भ.प. नारायणदास वैष्णव महाराज, बाळासाहेब शिंदे,वासूदेवराव महाले, आरीज बेग, नरेश राठोड , श्रीराम मेश्राम सरपंच तळणी,अमोल मांगुळकर,सुनिल भारती, छोटू देशमुख,देवराज महाराज, परसराम राठोड,मनोज राठोड,अतुल देशमुख या कार्यक्रमाचे आयोजक साहीदसेठ रयानी, विष्णू लोणकर, प्रा. डेहनकर, अशोक वाघमारे, सौ. कुसुमबाई लोणकर, सौ. लता वाघमारे, सुनंदाताई बोक्से यांचेसह असंख्य भाविक भक्तांनी उपस्थीती दर्शविली होती.







