✒️शेख रफिक माहूर (Mahur तालुका प्रतिनिधी)
माहूर(दि.28 ऑगस्ट) :-
गुरुवार दिनांक 28 रोजी दुपारी दोनच्या सुमारास प्रचंड विजांच्या कडकडाटासह सुमारे एक तास मुसळधार पाऊस पडला असून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर ऋषिपंचमी असल्याने भाविकांची मोठी गर्दी होऊन सकाळी अकराच्या दरम्यान ट्राफिक जाम सुद्धा झाली होती झाली होती.
मागील पावसामध्ये काही दिवसापूर्वी महाकाली किल्ल्याची तटरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला होता त्यावेळी कुठलीही दुर्घटना झाली नव्हती असाच जोरदार पावसामुळे पुन्हा किल्ल्याच्या तटरक्षक भिंतीची नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरातत्व विभागाने काहीतरी उपाययोजना करावी असे भाविक व्यक्त करीत आहेत .







