🔸पालकही विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी बेफिकीर
🔹मोठी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?संस्थाचालक की, वाहनमालक
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.26 ऑगस्ट) :- तालुक्यांत शैक्षणिक संस्थांची शिक्षण धोरणाला तिजांजली देत व्यवसायीक बाजारा प्रमाणे स्पर्धा निर्माण झाली. खाजगी शाळा, इंग्रजी कॉन्व्हेंट मध्ये दैनंदिन विद्यार्थ्यांची खेड्यापाड्यातून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरून विद्यार्थ्यांना खाजगी वाहनातून भरगच्च कोंबून अवैद्य वाहतूकी द्वारे शहरात आणले जाते, याचे संस्थाचालकाला काही एक देणे घेणे राहिले नाही. 26 ऑगस्ट रोजी फुलसांगवी येथील जागृत पत्रकारांनी अशा प्रकारच्या अवैध्य विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांस जॉब विचारण्याचा प्रयत्न केला परंतु वाहनधारकांनी त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
महागाव शहरांसह तालुक्यांत अनेक खाजगी शैक्षणिक सस्थानंसह इंग्रजी कॉन्व्हेंट व्यवसायाला भरभराटी आली आहे. महागाव येथील खाजगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वीस ते पंचवीसच्या संख्येने एकाच वेळी टाटा मॅजिक वाहनातून फुलसांगवी मार्गे घामापुर तांडा येथून महागावात भरगच्च भरलेल्या वाहनधारक फुलसावंगी येथील निर्भीड पत्रकार तसलीम भाई यांच्या नजरेत पडले. सदर वाहन धारकाच्या चौकशीचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाला. विद्यार्थ्यांना खाजगी वाहनातून प्रचंड रीत्या कोंबून अवैध वाहतूक केली जात आहे. आर्थिक नफाखोरीच्या हव्यासापोटी वाहन चालक-मालक या वाहनात गुरांसारखे लहान बालकांना कोंबून आणत आहेत.
सदर वाहनधारक, आणि संस्थाचालक बालकांच्या जीवांसी खेळत आहेत. पालकांनी कमी पैसे घेणाऱ्या आणि जादा संख्येने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनातून आपल्या पाल्यांना पाठवणे किती चुकीचे आहे? आणि शाळा व्यवस्थापन समितीने या गंभीर प्रकाराकडे लक्ष दिले पाहिजे. अशा वाहनातून दुर्घटना घडण्याची नव्याने पुनरावृत्ती होऊ नये, पालकवर्ग ही या बाबतीत गंभीरतेने घेत नाहीत, ही एक मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. अशा वाहतुकीनंतर अनुचित घटना घडल्यानंतर आपण सावधगिरीचा पवित्र घेतो. या सर्व घटना घडू नये या साठी सतर्कतेची गरज आहे. मागील शैक्षणिक क्षेत्रात उमरखेड तालुक्यांतील दहागांव येथील इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात होऊन एका निष्पाप विद्यार्थिनीचा जीव गेल्याचे उदाहरण नजरेसमोर आहे.
सदर प्रकरण संस्था चालकांनी गुलदस्ता गुंडाळून ठेवले.तरीही महागाव तालुक्यात अशा प्रकारची विद्यार्थ्यांची अवैद्य वाहतूक होत आहे. पालकांना मुलांच्या जीवापेक्षा शिक्षण महत्त्वाचे वाटते तेवढीच त्यांची सुरक्षितताही गरजेची आहे. अनेक पालक स्कूलबस मध्ये आपल्या पाल्यांना पाठवितांना प्रवास भाडे कमी लागावे म्हणून खाजगी वाहनाचा सर्रास अवलंब करीत आहेत. अशा वाहनाला घरगुती सहा अधिक एक व्यक्तीसाठी आणि स्वतःच्या कुटुंबीयांसाठी वापर करणार असे वाहन नोंदणीच्या वेळी आरटीओ कार्यालयामध्ये नोंदणी दरम्यान एटीट्यूड द्यावे लागते.
आरटीओ ऑफिस द्वारे होणारी खाजगी वाहनाची नोंदणी देणे गेल्या कित्येक वर्षापासून बंद आहे. अशा प्रकारे अवैधपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या महागाव तालुक्यातील अशा गाड्यांचा इन्शुरन्स किती व्यक्तीचा आहे.? या सदर वाहनात सात व्यक्तीचा तेही एकाच कुटुंबातील घरगुतीकाम किंवा दवाखाना या कामासाठी वापर करणार? असे आरटीओला जरी नोंदणीच्या वेळी वाहन मालकांनी एपीट्यूड दिले असले तरी वास्तव्यात मात्र वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांना महागाव या ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर अंतरावर अवैध वाहतूक केल्या जात आहे.
सदर वाहनांवर 9834193826 असा दूरध्वनी क्रमांक असून सदर वाहन चालकाशी संपर्क केला असता सदर वाहनातून घमापुर या ठिकाणाहून फुलसांगवी मार्गे महागाव येथे रामभाऊ कोसलगे इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याचे वाहन चालका कडून माध्यमांना कळाले. पोलीस आयुक्त वाहतूकशाखा, आरटीओ अधिकारी यांनी अशा प्रकारची अवैध वाहतूक करणाऱ्या अनेक वाहना संदर्भात बैठक घेऊन वाहनावर कार्यवाहीच्या सूचना देतील का? महागाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष 24 तास जनतेच्या संरक्षणासाठी झटणारे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी ॲक्शन घेऊन विद्यार्थ्यांच्या होत असलेली अवैध वाहतूक रोखण्यासाठी मोहीम राबवत अशा वाहतुकीवर आळा घालावा, असे सुज्ञ नागरिकांतून बोलल्या जात आहे.
शासकीय नियमानुसार शाळेच्या गाड्या पिवळ्या रंगाच्या असणे बंधनकारक आहे. कारण अशा रंगाने
विद्यार्थ्यांच्या गाडीची ओळख सोपी होते.
पिवळा रंग लांबून दिसतो, त्यामुळे इतर वाहनचालकांना कळते की ही शाळेची गाडी आहे.
सुरक्षितता नियम
रस्ते सुरक्षेसाठी खास करून शाळेच्या बसेसना पिवळा रंग असणे आवश्यक ठरवले आहे.कायदेशीर कार्यवाही गाडी पिवळी नसल्यास आरटीओ प्रादेशिक परिवहन कार्यालय तपासणी मध्ये गाडीवर दंड किंवा चालान होऊ शकते.
फिटनेस सर्टिफिकेट मिळत नाही
शाळेच्या नियमानुसार रंगवलेली नसल्यास तिला फिटनेस सर्टिफिकेट किंवा परवाना मिळणार नाही.अपघाताचा धोका वाढतो इतरांना ही शाळेची गाडी आहे हे नीट न कळल्यास वाहतुकीत धोका संभवतो.
थोडक्यात शाळेची गाडी पिवळ्या रंगाची नसल्यास ती नियमबाह्य ठरते आणि तिच्यावर दंड व कारवाई होऊ शकते.
सदर अवैध विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या ड्रायव्हरला विचारणा केली असता उलट हजरजवाबी शब्दात माझाही भाऊ पत्रकार आहे,असे सांगत माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलल्या गेले आहे. पत्रकारीता क्षेत्राचा काही महाभाग गैरफायदा घेत गाडीवर प्रेस किंवा एखाद्या दैनिकाचे नाव टाकून गैरफायदा घेतांना दिसतात.अशा महाभागावर कार्यवाही होणे अत्यावश्यक आहे.







