राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयाचा कबड्डी संघ जिल्हास्तरावर

✒️ सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)

राजुरा(दि.26 ऑगस्ट) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर व तालुका क्रीडा कार्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरात शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

     तालुका क्रीडा संकुल च्या मैदानात झालेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय चिंचोली खुर्द हा संघ विजयी झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय चिंचोली संघाने शिवाजी हायस्कुल राजुरा या संघाचा पराभव करुन विजय संपादन केला.कबड्डी चा संघ राजुरा तालुक्यात अव्वल स्थानावर असून त्यांची निवड जिल्हा स्तरावर झालेली आहे.

त्याचप्रमाणे महर्षी उत्तम स्वामी महाराज कनिष्ठ विद्यालय चिंचोली खुर्द 19 वर्षा खालील मुलांचा संघ देखील राजुरा तालुक्यातुन प्रथम येऊन जिल्हास्तरावर निवड झाली आहे..चंद्रपूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत राजुरा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

विजयी संघाला शाळेचे मुख्याध्यापक रूपेश सोळंके, क्रीडा शिक्षक रवींद्र गोरे, महेंद्र चौधरी तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.