४८ तासात दुसऱ्यांदा पैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.19 ऑगस्ट) :- दोन दिवसापूर्वी शनिवारला ढगफुटी दृश्य पावसामुळे पैनगंगेला आलेल्या महापुरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते नदीकाठच्या नाल्याकाठच्या गावांना पुराचा वेढा पडला होता फुलसावंगी, शिरपुली, राहुर, चिंचोली, चिल्ली, टेंभी, काळी, भाबं, या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते यामध्ये अन्नधान्य कपडे भांडे जीवनावश्यक वस्तूंचे फार मोठे नुकसान झाले. दोन दिवसात कसेबसे सावरण्याचा प्रयत्न करत असतांनाच आता पुन्हा एकदा पूर्ण स्थिती निर्माण झाली. 

   राहुर शिरपुली फुलसांगी या गावांचा संपर्क तुटला. मराठवाडा व विदर्भात जाणाऱ्या पैनगंगानदी वरील फुलाच्या पलीकडील मराठवाड्यातील शिरपूल्ली ते कुपटी रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे संपर्क तुटला. दोन्ही गावांचे यांत शेती पिकाचे फार मोठे नुकसान झाले. शनिवारला आलेल्या अचानक पुराने शेतकऱ्यांचे शेतातील विद्युत पोल मोडून पडले. पिंकर,पाईप, मोटर, शेती अवजारे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले. आता शेतकऱ्याची एकच आशा उरली शासन मदत भरपाई देणार का? या कडे शेतकरी डोळे लावून बघत आहे. शेतकरी वर्गातून एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे फडणवीस सरकारने जी विधानसभा निवडणुकी काळात घोषणा केलेली होती, ती म्हणजे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी आता ही घोषणा पूर्ण करून दाखवावी. पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून भरीव मदत द्यावी अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.

(प्रशासनाच्या अधिकाऱ्याने दोन दिवसापासून प्रत्येक गावातील पूर्वग्रस्त कुटुंबांना भेटी दिल्या. ज्या कुटुंबाच्या घरामध्ये पाणी शिरलं त्या घरांचे सर्वे करणे चालू आहे. अनेकांच्या घरांमध्ये त्यांच्या जीवनावश्यक वस्तूं खराब झाल्या आहेत‌. त्यामुळे प्रशासनाने दोन दिवसात त्या कुटुंबांना आर्थिक मदत तातडीने द्यावी, पुराच्या पाण्यामुळे रोगराईची भीती निर्माण झाली. आरोग्य विभागाला ताबडतोब आदेश देऊन जंतुनाशकाची फवारणी करण्यास सांगावी. स्वच्छ पाणी पिण्याची सुद्धा प्रत्येक कुटुंबाला माहिती द्यावी. जेणेकरून रोगराई निर्माण होणार नाही. प्रशासनाने तातडीने पंचनामे करावे, ज्या शेतकऱ्यांचे शेती अवजार वाहून गेले, त्याचे सुद्धा पंचनामे करण्यात यावे. विद्युत पोल पडलेल्या शेतकऱ्यांचे महावितरण अधिकाऱ्याला सर्वे करताना सोबत घेऊन त्या गोष्टीचा सुद्धा सर्वे करण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्याची रब्बी पिकाच्या वेळेस महावितरण कार्यालयामध्ये पायपीट होणार नाही.)

निखिल विठ्ठलराव मोरतकर,एक शेतकरी