महागाव कृ.उ.बा.समीतीच्या संचालक मंडळाद्वारे खाजगी व्यापाऱ्यांकडून जमा होणाऱ्या शेष वसुलीत नियमांची पायमल्ली

🔹कृ.उ.बा. समितीचे कायम कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवत संचालक मंडळाने नेमलेल्या खाजगी कर्मचाऱ्यांकडून महागाव तालुक्यात अवैध शेष वसुली 

 ✒️विश्वनाथ महामुने महागाव(विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.15 ऑगस्ट) :- तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेष वसुली बाबत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून दर दिवशी कोणत्या गांवातील व्यापाऱ्यांच्या किती धान्याच्या गाड्या जातात याची माहिती सामाजिक कार्यकर्ते पंजाबराव गावंडे रा.उटी यांनी मागील अनेक दिवसापासून परिश्रम घेऊन स्वतःची पदरमोड करून खाजगी स्वतंत्र यंत्रणा नेमून महागाव तालुक्यातील पाचही ठिकाणी खाजगी व्यापाऱ्यांची कोणत्या गावातून किती धान्याच्या गाड्या नेमक्या जातात याची अद्यावत माहिती घेऊन जील्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांना दिली आहे.

   महागाव तालुक्यातील फुलसांगवी, हिवरा(संगम), काळी (दौ.) मुडाणा यासह महागाव या ठिकाणी खाजगी व्यापारांनी कोणत्या गावातून किती धान्याच्या गाड्या नेमक्या जातात याची अद्यावत माहिती घेऊन जिल्हा उपनिबंधक यांना दिली. याबाबत जिल्हा निबंधकांनी सखोल चौकशी केल्यास गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समितीचे लाखो रुपयांचे नुकसान संचालक मंडळ करीत आहे, हे लक्षात येईल.

खाजगी प्लेट काटा धारक यांना खाजगी व्यापाऱ्यांची धान्य विकल्याची माहिती देणे बंधनकारक नसल्यामुळे खाजगी प्लेट काटा धारक माहिती न देता सहकार्य करीत नसल्यामुळे प्रात्यक्षिक म्हणून बाजार समितीच्या आवारातील प्लेट काट्यावर तोलाई झालेल्या वाहनाचे वजन, गाडी नंबर, ड्रायव्हरचे नाव यांची अचुक माहिती गुंज येथील महेश ऍग्रो येथील प्लेट काट्याची संपूर्ण माहिती घेऊन पंजाबराव गावंडे यांनी दिलेल्या माहितीशी जुळवा जुळव करून चौकशी, केल्यास मोठे गौडबंगाल उघड होऊन होईल. गेल्या १८ महिन्यांपासून प्रत्यक्षात वास्तवात खरी शेष वसुली तालुक्यात किती झाली याची माहिती मिळेल. संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे बाजार समितीचे कायम कर्मचारी वैतागले असून नियमित वेतनही मिळत नसल्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्यांच्या मनस्थीतीवर विपरीत परिणाम झाल्यास संचालक मंडळच जबाबदार राहणार आहे. जिल्हा उपनिबंधक यवतमाळ यांनी वरील सर्व बाबी व या पुढील शेतकऱ्यांचे नुकसान व कृषी उत्पन्न बाजार समिती महागावचे शेष वसुलीमध्ये नुकसान होणार नाही.

या करिता महागाव तालुक्यातील खाजगी प्लेट काटे धारकांना सोबत घेऊन तसेच महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील प्लेट काटा तसेच गुंज येथील महेश ॲग्रो येथील प्लेट काट्यांचा डाटा उपलब्ध करून सखोल चौकशी अंती बाजार समितीचे आर्थिक नुकसान केले म्हणून संचालक मंडळावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंजाबराव देशमुख खडकेकर,पंजाबराव गावंडे यांनी सहकारी जिल्हा उपनिबंधक यवतमाळ यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करून केली आहे‌.