चारचाकी वाहने आयकर दातेही घेताहेत स्वस्त धान्याचा लाभ

🔸बोगस रेशनकार्ड धारकावर कार्यवाही होणार 

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी) 

महागाव(दि .12 ऑगस्ट) :- तालुक्यात पुरवठा निरीक्षण विभागाच्या वतीने रेशनकार्ड धारकांची पडताळणी केली नसल्याने ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे. घरामध्ये एखाद्या व्यक्ती शासनाच्या नोकरीवर आहे, असे रेशनकार्ड धारक मोफत धान्ये योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. त्या मुळे पुरवठा विभागाकडून शोधमोहीम राबविणे गरजेचे आहे.

  शासनाच्या ध्येय धोरणानुसार पात्र गरजू व्यक्ती धान्यापासून वंचित राहु नये हा उद्देश आहे. शासनाच्या ध्येय धोरणानुसार ज्यांच्या घरी चारचाकी कोणतेही वाहन असो, तसेच ज्यांच्या घरी एखादा व्यक्ती शासनाच्या नोकरीवर आहे.

अशा व्यक्तींचे राशनकार्ड शोधमोहीम राबवून अपात्रतेची कार्यवाही करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतोदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत रेशनकार्ड लाभार्थ्यांना दरमहा मोफत धान्याचा लाभ देण्यात येतो. परंतु चारचाकी मालक, आयकर दाते सरकारी कर्मचारी तसेच एक लाख रुपया पेक्षा जास्त उत्पन्न असणारे कार्डधारक सुद्धा हा लाभ घेत आहेत. काही राशन कार्ड धारक बनावट कागदपत्रे तयार करून राशन दुकानातून धान्याचे उचल करीत आहेत.

तालुक्यातील रेशन कार्ड लाभार्थ्याची यादी शासनामार्फत पुरवठा विभागाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार संबंधित लाभार्थ्यांचा पुरवठा विभागामार्फत शोध घेणे आवश्यक आहे.असे अपात्र रेशनकार्ड पडताळणी नंतर या लाभार्थ्यांचे रेशन धान्य बंद करणे आवश्यक आहे. परंतु माणगाव तालुक्यात राशन कार्ड धारकाची पडताळणी न झाल्यामुळे बरेच अपात्र रेशनकार्ड लाभार्थी धान्य योजनेचा लाभ घेत आहेत. रेशनधान्य लाभार्थ्यांनी स्वयंघोषणापत्र भरून पुरवठा विभागात दिले आहे.

त्यामुळे सदर कार्डधारकाची पडताळणी पुरवठा विभागातून महागाव तालुक्यात करण्यात आली नाही. त्या मुळे शासनाचे धान्य अशा लाभार्थ्यांना सुद्धा मिळत आहे. पात्र लाभार्थ्यांना महिन्यात प्रति व्यक्ति 15 किलो गहू 20 किलो तांदूळ आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या रेशनकार्ड धारक लाभार्थ्यांना दरमहा प्रतिव्यक्ती 2 किलो गहू, 3 किलो तांदूळ एवढ्या मोफत धान्याचा लाभ शासनातर्फे देण्यात येत आहे. बनावट कागदपत्र तयार करून रेशनधान्य उचल करणाऱ्यावर तसेच माहित असून सुद्धा लाभार्थ्यांची माहिती लपून ठेवणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारावर फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे.