नहर फुटल्याने लाखो लिटर पाणी गेले वाया

🔹शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.11 ऑगस्ट) : – 

          वरोरा तालुक्यातील शेगाव पासून जवळ येत असलेल्या रामदेगी परिसरात निमढेला तलावाला लागून चंदई नहर फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

          निमढेला तलावाचे पाणी चंदई नहराद्वारे जवळपास 20 किलोमीटर जात असून 6000 हेक्टर च्या जवळपास आसपास शेतीला फायदा होतो. तलावाचे बांधकाम चाळीस वर्षांपूर्वी करण्यात आले असून अगोदरच या परिसरात पाऊस कमी पडल्यामुळे धान लागवड पिकावर संकट ओढवलेले आहे त्यातच नहर फुटल्याने धान पिकांना पाणी मिळणे कठीण झाले असुन या नहरद्वारे अर्जुनी, तुकुम, कोकेवाडा, तुकुम, किनाळा, आष्टा , मानकर कोकेवाडा, वडाळा, विलोडा, काटवल भद्रावती तसेच वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीकांना पाण्याचा लाभ मिळत असतो. नहार फुटल्याने व निसर्गाने साथ न दिल्यास शेतकऱ्यावर संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.