✒️सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा (दि.9 ऑगस्ट) :- राजुरा तालुक्यातील मौजा कळमना हे जिल्हा स्मार्ट गाव, आदर्श ग्राम असून येथे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. येथील जनतेच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषण आहार यासाठी आरोग्य विभाग उपकेंद्र पांढरपौनी व प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राम आरोग्य पोषण आहार दिवस राबविण्यात आला.
या प्रसंगी आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई, डॉ. कोल्हे मॅडम उपकेंद्र पांढरपौनी, धांडे मॅडम ए एन एम उपकेंद्र पांढरपौनी, अंकुश जाधव आरोग्य सहाय्यक राजुरा, शुभांगी कवलकर मॅडम ग्राम सेवीका कळमना,लताताई शिरसागर सेवा निवृत्त अंगणवाडी सेवीका, कल्पना क्षिरसागर आशा वर्कर, शामकला चापले, अटकारे ताई, पिंगे ताई, विरुटकर ताई, अस्मिता वाढई, मेघा वाढई, अंगणवाडी मदतनीस कावळे, ताजने ताई यासह गावकरी उपस्थित होते.







