🔸दप्तरी सीड्स खरेदीमध्ये कंपनीची संशयास्पद भूमिका
🔹शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
✒️विश्वनाथ महामुने महागांव (Mahagaon प्रतिनिधी)
महागांव(दि.8 ऑगस्ट) :-
तालुक्यातील माळकिन्ही येथील शेतकऱ्यांनी अंदाजे शंभर एकर वरती दप्तरी सीड्स ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सेलू (वर्धा) या कंपनीचे कपाशीचे सीड लावले. परंतु सदर कपाशीचे सीड उपटून टाका असे कंपनीच्या एजंट मार्फत शेतकऱ्यांना कळविण्यात आले. सदर सीडचा कापूस खरेदी करण्यामध्ये कंपनीची संशयास्पद भूमिका वाटत आहे. दीड दोन महिन्यापासून संगोपन केलेले कपाशीचे सीड काढून टाकणे म्हणजे शेतकऱ्यांची कंपनीकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना बुधवारी निवेदन दिले.
मागील काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी दप्तरी कपाशीचे सीड घेतलेले आहे. आतापर्यंत कंपनीने सर्व मार्गदर्शन केले. परंतु आज रोजी दीड दोन महिन्याचे पीक झाल्यानंतर सदर दप्तरी कपाशीचे सीड उपटून टाका असे कंपनीच्या एजंट मार्फत शेतकऱ्यांना सांगितले जात आहे.
ज्यांना प्लॉट ठेवायचा असेल त्यांनी ठेवावे परंतु ठरलेल्या भावापेक्षा कमी भावा मध्ये सीड खरेदी केले जाईल असेही सांगत कंपनीद्वारे अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व शेतकरी संभ्रमात पडले आहेत. सदर सीडला 70 ते 80 टक्के खर्च करण्यात आला. पुढील दीड दोन महिन्यांमध्ये सीडचा कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये येऊ शकतो.
परंतु मध्येच दप्तरी सीड्स कंपनीकडून घेतलेला निर्णयामुळे कंपनी शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दावर ठाम राहत नसल्याचे दिसून येत आहे. महागांव तालुक्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. कंपनी विश्वासात घ्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला, या बाबत तोडगा काढून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा आशियाचे 6 आगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी निवेदनावर राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव, अरुण पाटील, प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख बिपिन चौधरी, अर्जुन कानडे, साईराम काळे, निरंजन तडस, वैभव हरीमकर, अशोक मते, भगवान खंदारे, सुनील भोने, आनंदा लाहोरे, संतोष मते, रमेश लहाने, गजानन गोदमले, सचिन मते, दिगांबर लाड, रमेश राठोड, धिरज काळे, संतोष खंदारे, गजानन अनखुळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.







