✒️ शेगाव बू (Shegaon bu विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
शेगाव बू (दि.21 जुलै) :-
शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, शेतमजूर ,मच्छीमार व कामगार यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मा.बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या नेतृत्वात शेगाव बुद्रुक येथे 24 जुलैला चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे सातबारा कोरा आदेशाची अंमलबजावणी व इतर प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे.
आपल्या भागातील राज्य/राष्ट्रीय NH233 शेगाव बु.चिमूर महामार्ग येथे 24 जुलै 2025 गुरुवार रोजी सकाळी 10 ते 12 या कालावधीत राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येईल.
या आंदोलनाच्या दरम्यान सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल रुग्णवाहिका ,अग्निशामक आपत्कालीन वाहने यांना कोणत्याही अडथळा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही याची सुद्धा पूर्णपणे काळजी घेतली जाईल.
या चक्काजाम आंदोलनाला शेतकरी कष्टकरी दिव्यांग शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार व कामगार यांनी हजारोच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांनी केले आहे.








